

Solapur hospital accused of taking money from patients covered under government health scheme; inquiry initiated.
Sakal
सोलापूर : विजापूर रोडवरील ॲपेक्स हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान आरोग्य योजना लागू असतानाही रुग्णांकडून पैसे घेतल्याची तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीनुसार आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांनी आज हॉस्पिटलची तपासणी केली असता, तक्रारीत तथ्य असल्याचे निदर्शनास आले. आरोग्याधिकाऱ्यांच्या भेटीनंतर हॉस्पिटलची मान्यता रद्द होण्याच्या भीतीने सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना योजनेतून उपचारासह मोफत जेवणही सुरू केल्याचे दिसून आले. याबाबत संबंधित आरोग्यमित्राला नोटीस काढण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे.