Accidental death : तुरीची पोती आणायला जाताना अपघाती मृत्यू
Solapur News : दुचाकीला कारने (एमएच १०, डीटी ५५८१) जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी अशोक बिराजदार यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मृताचा पुतण्या अमोल बिराजदार यांनी मंगळवेढा पोलिसांत फिर्याद दिली.
सोलापूर : तुरीची रास सुरु असताना तूर भरण्यासाठी दुचाकीवरून पोती आणायला गेलेल्या अशोक आमगोंडा बिराजदार (वय ५०) यांचा मरवडे ते मंगळवेढा रोडवरील तळसंगी फाट्याजवळ अपघात झाला.