
सोलापूर : होटगी विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी यापूर्वी २३ डिसेंबरचा मुहूर्त हुकल्यानंतर फ्लाय ९१ या कंपनीने जानेवारी अखेरीस विमानसेवा सुरू होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, विमानतळावर रिफ्यूल सेंटरची उभारणी, नाईट लॅंडिंगसाठी अतिक्रमण हटविण्यासाठी आणखी वेळ लागण्याची चिन्हे दिसत आहेत.