सोलापूर : सुकन्या योजनेच्या गुंतवणुकीचा वाढतोय टक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर : सुकन्या योजनेच्या गुंतवणुकीचा वाढतोय टक्का

सोलापूर : सुकन्या योजनेच्या गुंतवणुकीचा वाढतोय टक्का

सोलापूर ः मुलींचा जन्मदर वाढावा व मुलींच्या शिक्षणासाठी भक्कम आर्थिक तरतूद व्हावी या उद्देशाने सुरु झालेल्या पंतप्रधान सुकन्या योजनेचा प्रतिसाद वाढू लागला आहे. सध्याच्या स्थितीत सर्वाधिक व्याजदर व आयकर सवलतीची ही योजना बनली आहे.

सर्व साधारणपणे आयकराची वार्षिक रकमेच्या तुलनेत ही गुंतवणूक केली तर ती आयकरमुक्त ठरते. त्यामुळे आयकरात जाणारी रक्कम या योजनेत गुंतवणे सोयीचे ठरत आहे. याशिवाय गुंतवणुकीच्या सोबत योजनेच्या रकमेवरील व्याज व परिपक्वता रक्‍कमदेखील आयकरमुक्त केली गेली आहे. त्यामुळे आयकराच्या सवलतीचे तिहेरी लाभ या योजनेला मिळत आहेत. त्यानंतर पूर्वी या योजनेत सुरवातीची गुंतवणुकीची रक्कम अधिक असायची. आता ही सुरवातीची गुंतवणुकीची रक्कम फक्त २५० रुपये एवढी झाली आहे. तसेच या योजनेतील व्याजाचे दर देखील सर्वाधिक आहेत.

हेही वाचा: वानखेडेंच्या नावावर बार? क्रांती रेडकर मलिकांना म्हणाल्या, 'जबाबदार पदावर असूनही तुम्ही...'

ठळक बाबी

  • सर्वाधिक व्याज दर ७.६ टक्के

  • आयकराची तिहेरी सवलत

  • मुलीला वयाच्या १८ व्या वर्षी मोठ्या रकमेचा लाभ

  • सुरवातीची किमान गुंतवणूक २५० रुपयावर

"सोलापूर विभागात पंतप्रधान सुकन्या योजनेचा लाभ अधिकाधिक लाभार्थींपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. सोलापूर विभागात या मोहिमेत ८ हजार नवीन खाती उघडण्याचे उद्दीष्ट हाती घेण्यात आले आहे."

- ए. व्यंकटेश्‍वर रेड्डी, वरिष्ठ अधिक्षक, पोस्ट विभाग सोलापूर

loading image
go to top