
सोलापूर: कारखान्यातील २५ लाखांचा माल तारण ठेवून श्रीस्नेह एंटरप्राइजेसचे मालक श्रीकांत मदनलाल बलदवा (रा. विणकर वसाहतीमागे, अक्कलकोट रोड) यांच्याकडून तीन वर्षांपूर्वी ४ टक्के व्याजाने १० लाख रुपये घेतले होते. व्याजासह मुद्दल देऊनही त्यांनी माल विकला व पुन्हा पैसे मागितल्याने प्रकाश तुळजाराम एक्कलदेवी (वय ५७) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. वडिलांच्या आत्महत्येस बलदवाच कारणीभूत असल्याची फिर्याद मुलगा युवराज एक्कलदेवी यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली आहे.