Solapur Kharif Disbursement : खरिपात ६० टक्के कर्जवाटप; रब्बी हंगामाच्या वाटपाची चिंता पावसाच्या तुटीचा परिणाम; रब्बीसाठी २३४१ कोटींची तरतूद

₹2,341 Crore Crop Loan Provision for Rabi Season : सोलापूर जिल्ह्यात खरीप पीक कर्जासाठी २८५८ कोटींचे उद्दिष्ट असताना २१ सप्टेंबरपर्यंत १७१८ कोटी रुपयांचे, म्हणजे ६०.१३ टक्के कर्जवाटप झाले आहे.
Solapur Kharif Disbursement

Solapur Kharif Disbursement

esakal

Updated on: 

सोलापूर : वार्षिक पतपुरवठा आराखड्यात खरिपाच्या पीक कर्ज वाटपासाठी २८५८ कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी फक्त १७१८ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. पावसाअभावी यंदाचा खरीप वाया गेला आहे. पाऊस नसल्याचा मोठा परिणाम यंदाच्या रब्बी हंगामावरही होण्याची शक्यता आहे.

रब्बी हंगामासाठी २३४१ कोटी रुपयांच्या पीक कर्जाची तरतूद करण्यात आली आहे. पाऊसच नाही तर पीक कर्जवाटपाला कसा प्रतिसाद मिळणार? याबद्दल चिंता व्यक्त होऊ लागली आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी वार्षिक पतपुरवठा आराखड्यात २ लाख २८ हजार ८४१ शेतकऱ्यांना २८५८ कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २१ सप्टेंबरपर्यंत ९० हजार शेतकऱ्यांना १७१८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

Solapur Kharif Disbursement
बिस्लेरीने अंघोळी करणाच्या वक्तव्यावरून ट्रोल, आता स्पष्टीकरण देत जान्हवीने दाखवले फोटो, म्हणाली...

उद्दिष्टाच्या ६०.१३ टक्केच कर्जवाटप होऊ शकले आहे. गेल्या वर्षी खरिपासाठी २००७ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले होते. या वर्षी जूनच्या शेवटी व जुलैच्या सुरुवातीला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने मोठा खंड दिल्याने खरिपाची पिके जळून गेली आहेत.

बैलपोळा व गणपतीमध्ये परतीचा पाऊस हजेरी लावत असल्याचा सोलापूर जिल्ह्याचा अनुभव आहे. यंदा पोळा आणि गणपतीमध्ये मुसळधार पाऊस झाला नाही. येत्या काळात पाऊस होईल की नाही, याचीही शाश्‍वती नाही. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या होतील का, असा मोठा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. रब्बीसाठी १ लाख ८९ हजार १४ शेतकऱ्यांसाठी २३४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांकडून व बँकांकडून रब्बीच्या पीक कर्जवाटपासाठी फारसा उत्साह राहणार नाही.

Solapur Kharif Disbursement
Solapur Auto Fare Hike : रिक्षांचा प्रवास सोलापुरात ९ ऑक्टोबरपासून महागणार रात्री २५ ते ४० टक्के अतिरिक्त भाडे; मीटर कॅलिब्रेशनसाठी ८ डिसेंबरची मुदत

१० ऑक्टोबरपासून ‘चित्रा’ सध्या सुरू असलेल्या हस्त नक्षत्रातील पावसाने निराशा केली आहे. १० ऑक्टोबरपासून चित्रा नक्षत्राला सुरुवात होणार आहे. या कालावधीत पाऊस झाला तरच रब्बीच्या पेरण्यांसाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. आतापर्यंतच्या जवळपास सर्वच नक्षत्रांनी सोलापूर जिल्ह्याची निराशा केल्याने जिल्हा प्रशासन दुष्काळाच्या दृष्टीने कामाला लागले आहे. ऑक्टोबर महिन्यातील पावसावर सोलापूर जिल्ह्यातील रब्बीचे विशेषत: ज्वारीचे उत्पादन अवलंबून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Barshitakli Kharif Crop Loss
Maharashtra farmer loan waiver latest news
Wardha Kharif Crop Loan
Solapur DCC Bank Loan : ओंकार साखर कारखाना ग्रुपला दिलेल्या कर्जाची चौकशी करावी  अॅड. दिपक पवार यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत मागणी
Marathi News Esakal
www.esakal.com