Solapur Auto Fare Hike : रिक्षांचा प्रवास सोलापुरात ९ ऑक्टोबरपासून महागणार रात्री २५ ते ४० टक्के अतिरिक्त भाडे; मीटर कॅलिब्रेशनसाठी ८ डिसेंबरची मुदत

First 1.5 Km Fare Set at ₹30 in Solapur : पहिल्या १.५ किलोमीटरसाठी ३० रुपये आणि त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी किमान २० रुपये भाडे राहणार असून, रात्रीच्या प्रवासासाठी २५ ते ४० टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.
Solapur Auto Fare Hike

Solapur Auto Fare Hike

esakal

Updated on: 

सोलापूर : नवीन दरानुसार तीन आसनी ऑटोरिक्षासाठी पहिल्या १.५ किलोमीटरसाठी ३० रुपये, तर त्यानंतर प्रत्येक १ किलोमीटरसाठी किमान देय भाडे २० रुपये राहणार आहे. ऑटोरिक्षा भाडेदर ९ ऑक्टोबरपासून लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

महापालिका क्षेत्रातील रिक्षांसाठी रात्री १२ ते सकाळी ५ या कालावधीत २५ टक्के अतिरिक्त भाडे, तर महापालिका क्षेत्राबाहेरील ग्रामीण भागाकरिता रात्री १० ते सकाळी ५ या कालावधीत ४० टक्के अतिरिक्त भाडे आकारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ऑटोरिक्षामधून प्रवाशांसोबत असलेल्या ६० बाय ४० सें.मी. आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या सामानासाठी ५ रुपये शुल्क आकारता येणार आहे.

Solapur Auto Fare Hike
Ravi Patil FIR : बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदारांची नावे वगळल्याप्रकरणी भाजप नेते डॉ. रवी पाटील यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल, पोलिसांची मोठी कारवाई

सुधारित भाडेदरानुसार इलेक्ट्रॉनिक मीटर बसविणे सर्व ऑटोरिक्षा चालक-मालकांना बंधनकारक करण्यात आले आहे. मीटर कॅलिब्रेशनसाठी ८ डिसेंबरपर्यंत ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून तात्पुरते टेरिफ कार्ड तयार करण्यात येणार असून, ते ८ डिसेंबरपर्यंत वैध राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व ऑटोरिक्षांमध्ये UPI QR Code आणि हेल्पलाइन क्रमांक १४२०६४६४२३ दर्शनी भागात बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Solapur Auto Fare Hike
बिस्लेरीने अंघोळी करणाच्या वक्तव्यावरून ट्रोल, आता स्पष्टीकरण देत जान्हवीने दाखवले फोटो, म्हणाली...

शेअर ए रिक्षा योजनेलाही मंजुरी छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि सोलापूर रेल्वे स्टेशन या दोन ठिकाणांपासून शेअर ए रिक्षा योजना ९ ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदरानुसार कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ७९ नवीन ऑटोरिक्षा थांब्यांच्या प्रस्तावांपैकी ६१ थांब्यांना मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित १८ प्रस्ताव अपुरी जागा, नियोजित ठिकाणी थांबे न आढळणे, वाहतुकीस अडथळा आणि महापालिका हद्दीत समाविष्ट नसणे आदी कारणांमुळे नाकारण्यात आले आहेत. मान्यता दिलेल्या ६१ थांब्यांवर महापालिकेने बोर्ड लावून, त्यामध्ये रिक्षांची संख्या नमूद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com