JANHAVI KILLEKAR BISLERI WATER BATHING CONTROVERSY
esakal
JANHAVI KILLEKAR RESPONDS TO BISLERI TROLLING: बिग बॉस मराठी ५ मधून चर्चेत आलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिची सध्या प्रचंड चर्चा होताना पहायला मिळतेय. कोल्हापूरला गेल्यानंतर स्किनचा त्रास असल्यानं बिस्लेरीच्या पाण्याने आंघोळ करायचे असं तिने एका मुलाखतीत म्हटलं होतं. तिच्या त्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं. दरम्यान आता जान्हवीनं एक व्हिडिओ शेअर करत ट्रोलर्सला चांगलंच सुनावलं आहे. जान्हवीनं दोन भागात पोस्ट करत बिस्लेरीनं अंघोळ करण्यामागचं कारण सांगितलं.