सोलापूर : कीर्तन, अन्नदान अन्‌ रक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

guru nanak

सोलापूर : कीर्तन, अन्नदान अन्‌ रक्तदान शिबिर

सोलापूर ः शहरातील अंत्रोळीकर नगरातील गुरुद्वारा गुरनानक दरबारच्या वतीने रक्तदान शिबिर, अन्नदान व इतर माध्यमातून गरजूंना मदतीचा हात दिला जातो. गुरु नानक जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता. १९) रोजी विशेष कार्यक्रम आयोजित केले आहेत.

शीख समाजबांधवाच्या वतीने गुरुद्वारा गुरूनानक दरबार या गुरुद्वाऱ्याची उभारणी काही वर्षांपूर्वी झाली. भक्तमंडळीनी या गुरुद्वाऱ्यात पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथसाहिबचे पाठ याठिकाणी सुरु केले. तेव्हापासून अनेक कार्यक्रम येथे साजरे केले जातात. कोरोनाच्या दीड वर्षाच्या काळात गुरुद्वाऱ्याच्या परिसरातील नागरिकांनी गुरुद्वाऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गरजू व भूकेल्या लोकांना अन्नधान्य पाकिटाचे वाटप केले. या कालावधीत कोरोना नियमामुळे लंगर (अन्नछत्र) बंद असले तरी पाकिटाचे वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आले. त्यानंतर काही दिवसापासून नियमित लंगरला सुरवात झाली आहे. जे कोणी भुकेले आहेत त्यांना भोजन दिले जाते. दिवसातून दोन वेळेस हा उपक्रम राबवला जातो. गुरु नानक जयंतीच्या निमित्ताने रविवारपासून (ता.७ नोव्हेंबर) विशेष कार्यक्रम सुरु झाले आहेत. या कार्यक्रमासाठी रोपड (पंजाब) येथील जुझारसिंग गुरुमत मशिनरी कॉलेजचे वीर मनिंदरपाल सिंघ व रागी मनजीत सिंघ शांत (जालंदर) हे विशेष मार्गदर्शनासाठी उपलब्ध झाले आहेत. त्यांची नित्य प्रवचने आयोजित केली आहेत.

हेही वाचा: "मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

प्रसाद वाटप

गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वाऱ्यात रक्तदान शिबिर दुपारी १२ ते सांयकाळी पाच या वेळेत होत आहे. सकाळी ६ ते ८.३० या कालावधीत कीर्तन होणार आहे. सकाळी १० ते १ या कालावधीत गुरु ग्रंथ साहिबजी पाठाची समाप्ती होणार आहे. रात्री ९ ते १२ या कालावधीत सत्संग कीर्तन होणार आहे. कीर्तनानंतर प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

loading image
go to top