

Solapur LPG News New Domestic Gas Cylinder Rule Requires Online Booking And 25 Day Gap For Second Cylinder
sakal
सोलापूर : सणासुदीत गॅस सिलिंडरचा तुटवडा होऊ नये म्हणून केंद्र शासनाच्या आदेशानुसार गॅस कंपन्यांनी घरगुती सिलिंडरसाठी ऑनलाइन बुकिंग बंधनकारक केले आहे. आता २५ दिवसानंतर दुसरा सिलिंडर मिळतो. त्यासाठी कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल देऊन किंवा वितरकांमार्फत देखील सिलिंडर बुकिंग करता येतो. त्यासाठी नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी व कोड क्रमांक द्यावा लागतो.