Solapur : भाळवणी ते हुन्नुर या नवीन विद्युत वाहीनीसाठी 1 कोटी 31 लाख ; आ. आवताडे Solapur Mangalvedha Bhalvani 1 crore 31 lakh new power lin | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आ. समाधान आवताडे

Solapur : भाळवणी ते हुन्नुर या नवीन विद्युत वाहीनीसाठी 1 कोटी 31 लाख ; आ. आवताडे

मंगळवेढा : दक्षिण भागातील शेतकय्रांना पुरेशा दाबाने सुरळीत विजपुरवठा करण्यासाठी भाळवणी ते हुन्नुर या 33 केव्ही नवीन विद्युत वाहिनीसाठी 1 कोटी 31 लाख रुपये निधीची तरतूद झाली. नव्या विदुत वाहीनीमुळे हून्नूर, खुपसंगी, नंदेश्वर उपकेंद्रातील 15 गावांमध्ये सुरळीत व अखंडित वीज पुरवठा होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

मंगळवेढयातील 132 केव्ही केंद्रातून हुन्नूर येथील उपकेंद्रात 33 केवी विद्युत वाहिनीचे काम गेल्या अनेक वर्षांपूर्वी करण्यात आले.सध्या ही वाहिनी ओव्हरलोड झाली असून नंदेश्वर, खूपसंगी, हुन्नूर या उपकेंद्रांतर्गत येणार्‍या गावांना अपुर्‍या दाबाने व खंडित वीज पुरवठा होत असल्याने या भागातील शेतकरी झाले.

याबाबत येथील शेतकर्‍यांनी आ समाधान आवताडे यांच्याकडे गावभेट दौय्रात व कार्यालयात भेटून तक्रार करत नवीन वाहिनी टाकण्याची मागणी केली. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांना अखंडित व पुरेशा दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी नव्याने झालेल्या भाळवणी येथील 132 केव्ही केंद्रातून नवीन विद्युत वाहिनी टाकण्याची मागणी

आ.समाधान आवताडे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दिनांक 16 जानेवारी 23 रोजी केली. त्यानुसार पालकमंत्री विखे पाटील यांनी तातडीने या वाहिनी चे काम होण्यासाठी डीपीडीसीतून एक कोटी एकतीस लाखाचा निधी मंजूर केला. भाळवणी ते हुन्नूर ही 33 केव्ही ची लाईन 11 किमी इतकी आहे.

या नवीन वाहिनी मुळे खुपसंगी,नंदेश्वर, हुन्नूर या उपकेंद्रांतर्गत येणार्‍या नंदेश्वर, खडकी, हून्नूर, मानेवाडी, रेवेवाडी, पडोळकरवाडी, भोसे, ममदाबाद हु, लोणार, खुपसंगी जुनोनी, पाठकळ, शिरशी, गोनेवाडी, लेंडवे चिंचाळे, कचरेवाडी गावांना अखंडित व नियमित वीज पुरवठा होणार असून लोडशेडींग ट्रीपिंगचा विषय शेतकर्‍यांना भेडसावणार नाही.

तसेच नव्या वाहीनीमुळे आंधळगाव उपकेद्राचा अतिरिक्त भार देखील कमी होणार आहे महावितरणच्या वाहीनीच्या कामासाठी प्रथमच मोठया प्रमाणात निधी उपलब्ध झाला त्यामध्ये 10 कोटीचा निधी मिळाल्याने पंढरपूर मंगळवेढा तालुक्यासाठी महावितरणच्या नवीन डीपी,अतिरिक्त डीपी,मेंटेनन्स नवीन वीज जोडणी ही कामे होणार आहेत

सदर कामासाठी शेतकर्‍यांनी कोणत्याही अधिकारी अथवा ठेकेदाराला एक रुपया ही देऊ नये तशी कोणी मागणी केल्यास आपल्याशी संपर्क साधावा व सुरू असलेली कामे गुणवत्तापूर्ण दर्जेदार करून घ्यावीत असे आवाहन आ. समाधान आवताडे यांनी केले