
Solapur : गोरगरिबांच्या केसाला धक्का लागला तर हा भगीरथ काळ म्हणून उभा राहिल
मंगळवेढा : मंगळवेढ्यातील जनतेला छळण्याचे काम अधिकारी करत आहे.लोकशाही पध्दतीने दोन वर्षे शांत होतो.यापुढील काळात गोरगरिबांच्या केसाला धक्का लागला तर हा भगीरथ काळ म्हणून उभा राहिल असा इशारा दिला. राष्ट्रवादी नेते भगीरथ भालके यांनी प्रांत कार्यालयासमोर बोलताना दिला.
मंगळवेढ्यात अधिकाऱ्याकडून होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ 28 मागण्याचे निवेदन घेऊन प्रांत कार्यालयावर हलगी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते उपस्थित जनसमुदाया समोर बोलत होते. यावेळी रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील, उपाध्यक्ष तानाजी खरात,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी,प्रतिक किल्लेदार,अजित जगताप, अरुण किल्लेदार,प्रविण खवतोडे,
औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे,सोमनाथ माळी, सुरेश कोळेकर,दयानंद सोनगे,भारत बेदरे,भारत पाटील,संभाजी गावकरे, नितीन पाटील, गुलाब चौगुले, दिनकर यादव, संदीप फडतरे, राहुल वाकडे, चंद्रकांत काकडे ,अजित यादव, आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना म्हणाले की,
दुष्काळी गावाला नसलेले पाणी प्रत्यक्षात कागदावर पाणी आणण्याचे काम भारतनानी केले.याच शेतीच्या पाण्यासाठी विधानसभा हलवून ठेवायला हवी होती.पण एकदाच प्रश्न उपस्थित करून आठवड्यात मंजूरी देतो.या आश्वासनावर सत्कार करून श्रेय घेतले.नारळ फोडण्यावरून बावची व पौट या रस्त्याचे काम अडवण्याचा प्रयत्न अधिकाऱ्या मार्फत केला.
तर विरोधातील ग्रामपंचायतीचा निधी अडविण्याची कोणती मोगलाई मंगळवेढ्यात आलीय. तालुक्यातील 65 छावण्याची बिले तीन वर्षांनंतर बिले अदा नाहीत.छावणी चालकांनाही वेठीस धरण्याचे काम होत आहे. बसवेश्वराचे राष्ट्रीय स्मारक समितीच अस्तित्वात नसल्यामुळे रखडले या कामाला मुहूर्त कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
भारतनानाच्या कामाचा विसर पडला.शहर विकास आराखड्याला प्रशासक म्हणतात कुणी केले माहीत नाही.तर मुख्याधिकारी गाणी म्हणण्यात वस्त असल्याने शहरवासीयांना देशोधडीला लावण्याचे काम या आराखड्यातून सुरू आहे.राहूल शहा म्हणाले की,दोन वर्षात कोणत्याही शासकीय कार्यालयातील काम सहजरीत्या होत नाही.छावण्याची बिले प्रलंबित ठेवून कर्जबाजारी पण प्रशासनाला जाणीव नाही.
त्यांची वर्तणूक बदलावी अन्यथा जनतेला रोषाला सामोरे जावे लागत आहे.दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील म्हणाले की,सीमावर्ती भागातून कामासाठी आलेल्या तालुक्यातील जनतेला वेठीस धरण्याचे काम प्रशासन करीत आहे.हा अन्याय चालूच ठेवला तर भविष्यात कुलुप लावण्याचा इशारा दिला.अजित जगताप म्हणाले की,शासकीय कार्यालयात दोन वर्षापासून पिळवणूक होत आहे त्यांना जाब विचारणारे कोण नाही.
श्रेयावरून नाट्यगृहाचे काम रखडवून ठेवला.प्रमुख प्रश्नाला निधी आणण्याऐवजी सोयीच्या कामाला निधी मिळवला जात आहे.शहरातील लोक बेघर होत असताना लोकप्रतिनिधी गप्प आहेत.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष
चंद्रशेखर कौडूभैरी म्हणाले की,शहरातील तहसील,पंचायत समिती,नगरपालिका, या शासकीय कार्यालयात नागरिकांना त्रास विशेषत तहसील कार्यालयात आस्थापना शाखेत मोठ्या प्रमाणात त्रास होतो हे अधिकाय्राला ठणकावून सांगण्याची गरज आहे.पोलीस प्रशासनावर आवाज उठविल्यावर गुन्हेगार ठरविले जाते,शासकीय अधिकाय्राची मुजोरी वाढली आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पी.बी. पाटील यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रांत अधिकाऱ्यांचा हट्टीपणा
प्रांत कार्यालयावर काढलेल्या हलगी मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयात हजर असलेल्या प्रांताधिकार्यांनी समोर येणे अपेक्षित होते परंतु उपस्थित जमावाचा रोषामुळे त्यांनी निवडक 25 लोकांना आत येऊन निवेदन देण्याचा आग्रह धरला मात्र मोर्चेकरी बाहेर येण्याच्या अटीव ठाम राहिल्यामुळे शेवटी तहसीलदार मदन जाधव यांनी हे निवेदन स्वीकारले.