Solapur News: मंगळवेढा राष्ट्रवादीला जनाधार मिळतोय,पण समस्याकडे नेत्यांचे दुर्लक्ष

नुकत्याच झालेल्या 18 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालाचे अवलोकन केले
NCP Solapur News
NCP Solapur Newsesakal
Updated on

मंगळवेढा : तालुक्यातील जनतेला अजूनही विविध समस्याला सामोरे जावे लागत आहे परंतु या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रशासनावर जबाब टाकून सोडवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणावे तितके लक्ष देत नसल्याने खंत नागरिकांत व्यक्त केले जात आहे.

नुकत्याच झालेल्या 18 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालाचे अवलोकन केले असता राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांच्याकडे राज्यातील सत्ता, कारखानदारी व स्थानिक पातळीवर कोणती सत्ता नसताना मतदाराने त्यांच्या पारड्यात काही ग्रामपंचायती टाकल्या.

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातून मंगळवेढा तालुक्यासाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना, भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना,खरीप पिक विमा,मृगबहार फळबागाचा विमा, याचबरोबर अतिवृष्टी भरपाईत केलेला दुजाभाव, तसेच शेतीपंपाची वीज अतिरिक्त ट्रांसफार्मर, रखडलेल्या स्मारकाचा प्रश्न आधी

विषयावर विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने यावर आवाज उठवणे अपेक्षित होते किंबहुना राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना स्थानिक पातळीवरून तशा पद्धतीने होत असलेल्या अन्यायाची अन्याय माहिती देणे अपेक्षित होते परंतु दुर्दैवाने देण्यात आलेले नाही.

2009 च्या विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीला हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागली मात्र 2019 ला हा मतदारसंघ ताब्यात घेण्यात यश आले.

पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला असला तरी राष्ट्रवादीच्या मतांमध्ये मात्र वाढ झाली आहे परंतु व्यासपीठावर व नेत्याच्या कानामध्ये सर्व काही आलबेल आहे असे सांगणारे नेते जनतेच्या प्रश्नाकडे मात्र ढूकूनही बघत नसलेले चित्र सध्या मतदारसंघांमध्ये आहे.

दामाजीवर सत्ता मिळवताना परिचारक गटाची मदत घेत समविचारीच्या माध्यमातून सत्ता मिळवले परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेचा विचार करता पक्षीय चिन्हावर लढावे लागत असताना राष्ट्रवादी प्रभावीपणे त्या निवडणुकीला सामोरे जाणार का ? हा प्रश्न या निमित्ताने उभा राहत आहे जनतेच्या प्रश्नावर आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळवण्यासाठी अनेक संधी असताना देखील या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अद्यापही आवाज उठविला नाही.

नगरपालिकेच्या शहर विकास आराखड्यामध्ये जवळपास 300 मालमत्ता धारकांची नुकसानीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते आंदोलनाच्या माध्यमातून सक्रिय झाल्याचे चित्र दिसले. याच मोर्चात एका कार्यकर्त्याने स्व.भालके असते तर हा प्रश्न विचारात इतरांची कान उघडणी केली.

आराखड्याच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते एकत्र आले हे जरी सुखावह असले तरी जनतेच्या इतर प्रश्नासाठी हे नेते कधी एकत्र येऊन आवाज उठवणार असा प्रश्न या निमित्ताने उभा राहत आहे.

तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या पालकत्वाची जबाबदारी घेतलेले आ.रोहित पवार हे देखील या मतदारसंघात त्यांचा संपर्क देखील तुरळकच असल्यामुळे या मतदार संघात राष्ट्रवादीची पुर्न बांधणी कशी करणार ? असा देखील प्रश्न या निमित्ताने समोर उभा राहत आहे तर दुसऱ्या बाजूला भालकेच्या काही समर्थकाने राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते या मतदारसंघात आलेले देखील कळत नाही

व्हाट्सअप स्टेटस वरून कळत असल्याचे खंत देखील यापूर्वी व्यक्त करण्यात आली.तालुकाध्यक्षाच्या गटाचा ग्रामपंचायत निवडणूकीत पराभव स्वीकारावा लागला.

स्थानिक नेते पक्ष बांधणी पेक्षा समविचारीचाच जोर धरू लागले आहेत.त्यामुळे या मतदारसंघात पक्ष बांधणी करण्यासाठी राष्ट्रवादीची नेते गांभीर्याने घेतात यावर राष्ट्रवादीचे भविष्य अवलंबून आहे अन्यथा सर्वकाही अलबेल आहे असे सांगय्राचे ऐकल्यास राष्ट्रवादीला आगामी निवडणूक काही जागा देखील गमावाव्या लागतील अशी परिस्थिती असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com