Solapur : मंगळवेढ्यातील १९ हजार १५७ शेतकरी e-KYC पासून दूर

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी केवायसी केली नसल्यामुळे 12 हप्ता मिळण्यापासून वंचीत रहावे लागणार
PM Kisan Yojana E-KYC
PM Kisan Yojana E-KYCesakal

मंगळवेढा : तालुक्यातील 19157 शेतकय्रांनी अदयापही पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी केवायसी केली नसल्यामुळे त्यांना 12 हप्ता मिळण्यापासून वंचीत रहावे लागणार आहे. केवायसी करण्यासाठी त्यांच्यासाठी फक्त तीन दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत शेतकय्रांना वार्षीक 8 हजार रुचे अनुदान केंद्र शासनाकडून दिले जाते यासाठी पात्र शेतकय्रांनी महसूल खात्याकडून अर्ज सादर केले.त्यामध्ये अनेक आयकर भरणाय्रा व अपात्र शेतकय्रांनी घुसखोरी केली.

याबाबत ओरड झाल्यानंतर यांची चौकशी प्रशासनाने केल्यानंतर आयकर भरणाय्रा 710 शेतकय्राकडून त्या रक्कम वसूल करुन घेतल्या तर 1536 अपात्र शेतकय्राकडून ही पैसे परत भरुन घेतले परंतु पैसे भरले नाहीत अशा शेतकय्रांची खाती ब्लॉक करुन ठेवली आहेत.त्यानंतर या प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने केवायसीचा पर्याय उपलब्ध केला त्यामध्ये मोबाईल ओटीपी व्दारे व अंगठा लावून केवायसी केली.

31 मे पर्यत असलेली मुदत वाढवून ती 31 ऑगष्ट करण्यात आली. 11 वा हप्ता आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर सोडण्यात आला परंतु तालुक्यात अजून 19 हजार 157 शेतकय्रांनी अदयापही केवायसी केली नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले.

त्यामध्ये सर्वाधीक शेतकरी मंगळवेढा शिवारातील असून केवायसी पासून वंचीत असलेले शेतकरी गावनिहाय पुढील प्रमाणे अकोला 228,आंधळगाव 533,अरळी 277,आसबेवाडी 93,बठाण 215,बावची 231,भालेवाडी 182, भाळवणी 283,भोसे 620,बोराळे 547,ब्रम्हपुरी 241,चिक्कलगी 277,देगाव 148,धर्मगाव 207,ढवळस 178,डिकसळ 129,डोणज 400,डोंगरगाव 205,फटेवाडी 106,गणेशवाडी 180,घरनिकी 179,गोणेवाडी 286,गुजेगाव 309,हाजापूर 137,हिवरगाव 91,हुलजंती 670,हुन्नुर 312,जालीहाळ 212,जंगलगी 166,जित्ती 99,जुनोनी 177,कचरेवाडी 277,कागष्ठ 83,कर्जाळ 66,कात्राळ 124,खडकी 125,खवे 77,खोमनाळ 169,खुपसंगी 282,लमाणतांडा 79,लवंगी 200,लक्ष्मी दहीवडी 426,लेंडवे चिंचाळे 192,लोणार 234,माचणूर 93,महमदाबाद शे.222,मल्लेवाडी 161,मानेवाडी 126,मंगळवेढा 1951,मारापूर 228,मरवडे 292,मारोळी 128,मेटकरवाडी 64,मुढवी 209,मुंढेवाडी 168,नंदेश्‍वर 485,नंदूर 443,निंबोणी 250,पडोळकरवाडी 222,पाठखळ 291,पौट 114,रडडे 400,रहाटेवाडी 108,रेवेवाडी 112,सलगर बु 350,सलगर खु 199,चोखामेळा नगर 3,दामाजीनगर 9,शेलेवाडी 174,शिरसी 169,शिरनांदगी 211,शिवनगी 125,सिध्दापूर 270,सिध्दनकेरी 86,सोडडी 208,तळसंगी 307,तामदर्डी 122,तांडोर 219, उचेठाण 169,येड्राव 122,येळगी 139

केवायसीपासून राहिलेल्या शेतकय्राच्या यादया मंडल कृषी अधिकारी व कृषीसहायकामार्फत गावोगावी देण्यात आल्या असून वंचीत शेतकय्रांनी त्याच्याशी संपर्क साधून 31 ऑगष्ट पर्यत केवायसी करुन घ्यावी अन्यथा 12 हप्ता न मिळण्यास व या योजनेतून नाव कमी होण्यास ते जबाबदार राहतील.

- गणेश श्रीखंडे तालुका कृषी अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com