Solapur : वाळू तस्करीतील 'पुष्पा' म्हणतोय, "झुकेगा नही साला !"

मंत्रीसाहेब, जरा अवैद्य वाळू उपशाकडेही लक्ष द्या !
 वाळू
वाळूsakal

सांगोला : पालकमंत्र्याच्या तोंडी आदेशाने सांगोला तालुक्यासह जिल्ह्यातील अवैद्य खडी क्रशर बंद करण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे खडी क्रशर बंद करण्यात करण्यात आले असले तरी दुसरीकडे सांगोला तालुक्यात अवैद्य वाळू उपसा मात्र राजरोषपणे सुरू आहे. 'मंत्रीसाहेब, जरा अवैद्य वाळू उपशाकडेही लक्ष द्या, अवैद्य खडी क्रशर प्रमाणे अवैद्य काळ्या सोन्याच्या चोरीकडेही लक्ष देण्याचे आदेश द्या' अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सांगोला तालुक्यात मान, अप्रुफा, कोरडा, बेलवन अशा नद्या जातात. या नदीपात्रातील वाळू अवैद्यरित्या मोठ्या प्रमाणात उपसली जात आहे. सरकारी आदेशाने थोड्याफार कारवाईचे ढोंग जरी होत असताना दिसत असले तरी मात्र तालुक्यात सध्या या काळे सोने लुटण्याचे प्रमाण राजरोसपणे सुरू आहे. या अवैद्य वाळू उपसा प्रशासकीय अधिकारी कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे.

नदीपात्रातील वाळू उपसा करून बांधकामापर्यंत पोहोचविण्यासाठीची एक व्यवस्थाच करण्यात आलेली दिसून येते. एखादी छोटी मोठी कारवाई केलेली दिसून येत असले तरी अनेक महत्त्वाच्या ठिकाणाहून दिवसाढवळ्याही वाळू उपसा केले जाते. याला जबाबदार कोण ? असे नागरिक बोलले जात आहे.

खडी क्रशरवर कारवाई, मग अवैद्य वाळू उपशावर का नाही ?

सांगोला तालुक्यात २२ खडी क्रशर पैकी २१ खडी क्रशरवर महसूल प्रशासनाने कारवाई करून सील केले आहेत. ही खडी क्रेशर अवैद्य होती तर इतकी वर्ष हे सुरू कसे राहतात. एकाएकी हे कडी क्रेशर अवैद्य दाखवून बंदही केले जातात, परंतु दुसरीकडे मात्र राजरोसपणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असणारा अवैद्य वाळू उपसावर का कारवाई करण्यात येत नाही.

या व्यवस्थेला अभय का दिला जातो, किंवा अवैद्य वाळू उपसावर कारवाई करण्याचा वरून आदेश निघत नाही का? प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना ही वाळू चोरी दिसत नाही का ? असे प्रश्न नागरिकांना सतावत आहेत.

वाळू तस्करीतील 'पुष्पा' म्हणतोय, "झुकेगा नही साला !"

वरदहस्तांमुळे सुरू असलेला अवैद्य वाळू उपशामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुजोरी वाढली आहे. काही कर्मचाऱ्यांना गाडी आडवी लावणे, गाडी अंगावर घालण्याचे प्रकार या अगोदर घडले आहेत. तसेच अवैद्य वाळू करणारे तरुणांमध्येही फिल्मी स्टाईलने हाणामाऱ्या झाल्या आहेत.

अवैद्य वाळू व्यवसाय करणारे अनेक जण आपल्याला कोणी काही करीत नाहीत या अविर्भावात असतात. प्रशासनाने छोटीशी कारवाई केली तरीही काहीही बिघडत नाही असे ते बोलून दाखवतात. त्यामुळे वाळू तस्करीतील स्वतःला पुष्पा समजणारे लोक प्रशासनासमोर "झुकेगा नही साला..!" असे आवर्जून बोलतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com