मोहोळ : पाटकुल येथील सुनील घोडके खून प्रकरणी एकाला ताब्यात

संशयितांच्या शोधासाठी दोन पोलिस पथके तैनात; मृतावर अंत्यसंस्कार
crime
crime sakal
Published on

मोहोळ : पाटकुल (ता. मोहोळ) येथील सुनील घोडके खून प्रकरणातील संशयितांना मोहोळ पोलिसांनी अद्याप अटक केली नसून, त्यांच्या शोधासाठी दोन पोलिस पथके तैनात केली असल्याची माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राजकुमार डुणगे यांनी दिली. दरम्यान, वस्तुस्थितीची चौकशी करण्यासाठी संशयावरुन एकाला ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत माहिती अशी की, आमच्या बांधाची माती घेऊन तू रस्त्याचे खड्डे का बुजवतो, असे म्हणत तिघांना शिवीगाळ करीत एकाच्या डोक्‍यात टिकावाने वार करून गंभीर जखमी करून त्याचा खून केल्याप्रकरणी पाटकूल (ता. मोहोळ) येथील सहा जणांवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २६) दुपारी साडेबाराच्या दरम्यान पाटकुल येथे घडली.

crime
Corona Update : राज्यात 889 नवीन रुग्ण तर 17 रुग्णांचा मृत्यू

पाटकुल (ता. मोहोळ) येथे अनिल गोरखनाथ घोडके आणि यांचे मोठे भाऊ सुनील गोरखनाथ घोडके हे कुटुंबासह पाटकुल येथे राहतात. दोघेही शेती करून उपजीविका करतात. दोघांचाही ऊस कारखान्यांकडे गाळपास जाणार असल्याने शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान सुनील घोडके व त्यांचा मुलगा संग्राम व अनिल घोडके हे ऊस जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे बुजविण्यासाठी खोऱ्या व टिकाव घेऊन जालिंदर गावडे यांच्या बांधालगत असलेल्या रस्त्यावरची माती घेऊन खड्डे बुजवीत होते.

त्यावेळी त्या ठिकाणी जालिंदर विठोबा गावडे, अरुण जालिंदर गावडे, संतोष राजाराम एडके, अक्षय संतोष एडके, रोहन संतोष एडके, चांगदेव विठोबा गावडे (सर्व रा. पाटकूल) असे सहा जण हातात काठ्या घेऊन पळतच रस्ता करीत असलेल्या घोडकेबंधू जवळ आले. यातील अरुण गावडे व जालिंदर गावडे यांनी आमच्या बांधाची माती घेऊन तुम्ही रस्त्यावरील खड्डे का बुजवत आहात, असे म्हणत जालिंदर गावडे व चांगदेव गावडे यांनी धरा, याला सोडू नका हा नेहमीच आपल्याला त्रास देतो, याला खलास करा, असे म्हणत संतोष व रोहन एडके यांनी सुनील घोडके याला धरले.

crime
नवा व्हेरियंट, कृषी कायदे! PM मोदी करणार उद्या देशाला संबोधित

तर अरुण गावडे यांनी रस्त्यावरील टिकाव घेऊन सुनील घोडके यांच्या डोक्‍यामध्ये जोरात मारला व अक्षय याने पोटावर व पायावर मारहाण केली. संग्राम घोडके हा वडिलांना होत असलेली मारहाण सोडवण्यासाठी पुढे गेला असता त्यालाही व अनिल घोडके यांना मारहाण करण्यात आली. दरम्यान, मारहाणीमुळे गंभीर जखमी अवस्थेतील सुनील घोडके यांना मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी आणले असता डॉक्‍टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवले.

यात सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान सुनील गोरखनाथ घोडके याचा मृत्यू झाल्याची फिर्यादी त्यांचे बंधू अनिल गोरखनाथ घोडके यांनी मोहोळ पोलिसांना दिला असून, त्यानुसार पोलिसांनी वरील सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करीत आहेत. दरम्यान, घटनास्थळाला उपविभागीय अधिकारी सूर्यकांत पाटील यांनी भेट देऊन परिस्थीतीची माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
farmer loan waiver scheme issue
Marathi News Esakal
www.esakal.com