

25YearOld Woman from Barshi Poisons Infant Baby in Critical Condition
Esakal
सोलापुरात एका २५ वर्षीय महिलेनं चिमुकल्याला विष पाजून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. महिलेचं नाव अंकिता वैभव उकिरडे असं असून तिला १४ महिन्यांचा मुलगा आहे. अंकिताने मुलाला विष पाजलं. त्यानंतर साडीने गळफास घेत आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. अंकिताचा मुलगा अन्विक वाचला आहे तर अंकिताचा मृत्यू झाला.