
सोलापूर : सोलापूर ते गोवा दरम्यान विमानसेवेचा प्रारंभ ९ जून रोजी होणार आहे. सोलापूर ते गोवा विमानसेवेसाठी सध्या तिकीट बुकिंग सुरू असून साधारणतः एक महिन्यात सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर ते गोवा विमानसेवेतून होटगी रोड विमानतळ वापरात आल्यानंतर या ठिकाणी अन्य मार्गांसाठी नवीन कंपन्या येण्यास अधिक सुलभ होणार आहे.