Solapur Flight Ticket Price: मुंबईला जाण्यासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी मोजले १८ हजार; उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग केल्याने जादा दर; विमानसेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

Flight Ticket Prices Surge for Solapur–Mumbai Route: सोलापूरहून मुंबईसाठी उड्डाणाच्या चार तास आधी बुक केलेले विमान तिकीट तब्बल ४२ हजार रुपयांना विकले गेले. गोव्यासाठीही तिकीट दर १८ हजारांवर पोहोचले असून उन्हाळी सुट्या आणि लग्नसराईमुळे विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Solapur Flight Ticket Price

Solapur Flight Ticket Price

esakal

Updated on

सोलापूर: मागील आठवड्यापासून विमानाने सोलापूरहून गोवा व मुंबईसाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली. रविवारी मुंबईस जाणारी फ्लाईट फुल होती एकच तिकीट शिल्लक होते, ते ४२ हजार रुपयांस विकले गेले असून, हे आतापर्यंत सर्वाधिक किमतीस विकलेले तिकीट आहे. मागील आठवड्यात मुंबईसाठीचे एक तिकीट २७ हजारास तर गोव्यास जाण्यासाठी १८ हजारास तिकीट विक्री झाले होते. उन्हाळी सुट्या व लग्नसराईमुळे विमानांच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com