Lockdown
LockdownMedia Gallery

शहरातील दुकाने उघडणार? महापालिका आयुक्‍तांचा शासनाला प्रस्ताव

शहरातील दुकाने उघडण्याबाबत महापालिका आयुक्‍तांचा शासनाला प्रस्ताव

प्रशासनाने निर्णय रद्द करून शहरातील सर्व दुकानांना परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह लोकप्रतिनिधींनी महापालिका व जिल्हा प्रशासनाकडे केली.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेतील निर्बंध (Lockdown) शिथिल करतानाच राज्य सरकारने निकष ठरवून दिले. त्यानुसार सोलापूर शहर-जिल्ह्यातील अत्यावश्‍यक सेवेशिवाय अन्य दुकानांना परवानगी नाकारण्यात आली. मात्र, व्यापारी, लोकप्रतिनिधींचा विरोध पाहून महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर (P. Shivshankar) यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दुकानांबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे. (Solapur Municipal Commissioner's proposal to the government to open shops in the city)

Lockdown
टेस्ट वाढल्यानंतर रुग्णही वाढले ! शहरात 32 तर ग्रामीणमध्ये आढळले 527 रुग्ण

सोलापूर शहराची अंदाजित लोकसंख्या सद्य:स्थितीत 12 लाखांहून अधिक आहे. त्यापैकी आतापर्यंत जवळपास साडेतीन लाख संशयितांचीच कोरोना टेस्ट झाली असून त्यात 28 हजार 700 व्यक्‍ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. चिंतेची बाब म्हणजे, आतापर्यंत शहरातील 13 हजार 69 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्णांची संख्याही मोठी आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्वच दुकानांना सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत परवानगी द्यावी का, यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्यात सोमवारी (ता. 31) काही तास चर्चा झाली. बैठक संपल्यानंतरही महापालिका आयुक्‍तांनी आदेश काढण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांशी तब्बल दीड तास चर्चा केली. त्यानंतर पूर्वीचेच आदेश कायम ठेवण्याचे ठरले आणि तसा आदेश काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, प्रशासनाने निर्णय रद्द करून शहरातील सर्व दुकानांना परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह लोकप्रतिनिधींनी महापालिका व जिल्हा प्रशासनाकडे केली. त्याअनुषंगाने आज (मंगळवारी) महापालिका आयुक्‍तांनी राज्य शासनाला प्रस्ताव सादर केला आहे. त्यानंतर मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून अंतिम निर्णय होईल, असेही आयुक्‍तांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

Lockdown
चंद्रकांत पाटलांआधीच सांगोल्याच्या प्राध्यापकाने केली शरद पवारांवर पीएचडी !

...तर तिसरी लाट लवकर येईल

कोरोनाची पहिली लाट पूर्णपणे संपणार, असा विश्‍वास असतानाच दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला. मे महिन्यात एकूण टेस्टिंगमधील 4.65 टक्‍के लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. मात्र, चिंतेची बाब म्हणजे या महिन्यात मृत्यूदर सर्वाधिक 8.76 टक्‍क्‍यांवर पोचला होता. आता कोरोनाची लाट ओसरत असतानाच शहरातील सर्वच दुकानांना एकदम सुरू करण्याची परवानगी दिल्यास लवकरच तिसऱ्या लाटेची सुरवात होऊ शकते, असा अभिप्राय महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोंदविला आहे. घराबाहेर पडणाऱ्या व्यक्‍तींच्या माध्यमातून घरातील बालकांना संसर्ग होऊ शकतो, असेही मत त्यात नोंदविण्यात आले आहे. पोलिस प्रशासनानेही निर्णय घेताना सर्वसामान्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्यावी, असे मत नोंदविले आहे. तर ग्रामीण भागातील बहुतेक रुग्ण शहरात उपचारासाठी येत असल्याने ऑक्‍सिजन बेड कायमस्वरूपी 40 टक्‍के शिल्लक राहतील, असेही ठामपणे सांगता येत नाही. या पार्श्‍वभूमीवर आता महापालिका आयुक्‍तांनी पाठवलेल्या प्रस्तावावर काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आयुक्‍तांच्या प्रस्तावानुसार...

  • रुग्णांचा पॉझिटिव्हीटी दर चार टक्‍क्‍यांवर

  • एकूण ऑक्‍सिजन बेड 55.22 टक्‍के शिल्लक

  • एक हजार 715 पैकी 947 ऑक्‍सिजन बेडवर रुग्ण नाहीत

  • विडी कामगारांची संख्या 23 हजारांहून अधिक असून गारमेंट, टेक्‍स्टाईल उद्योगावर अनेकांचे कुटुंब अवलंबून

  • लोकप्रतिनिधी, व्यापाऱ्यांची मागणी वाढली असून शहरासाठी स्वतंत्र निर्णय घेण्यास परवानगी द्यावी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com