

Protest erupts in Solapur after civic body hires retired employees instead of providing opportunities to unemployed youth.
Sakal
सोलापूर: महापालिकेत महत्त्वाच्या विविध विभागात भरतीसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. पेन्शन इतकेच मानधन या कर्मचाऱ्यांना देऊन नियुक्ती केली जाणार आहे. अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्यानेच या निवृत्त कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाकडून पुन्हा संधी दिली जात असून या नियुक्त्यांमुळे पुन्हा तीच माणसे खुर्चीवर ठिय्या मांडून बसणार असल्याचा आरोप होऊ लागला आहे.