
Veena Pawar takes over as Additional Commissioner of Solapur Municipal Corporation; Ravi Pawar transferred to Pune.
esakal
सोलापूर: ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ आदी मोहिमेअंतर्गत केवळ दहा महिन्यांत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत नवा पॅटर्न निर्माण करणारे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची पुणे महापालिकेत उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नूतन अतिरिक्त आयुक्त म्हणून वीणा पवार यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाने सोमवारी काढले आहेत.