
सोलापूर : महापालिकेतील ४३ लिपिकांच्या विविध विभागात अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ३८ कनिष्ठ श्रेणी लिपिक, २ वरिष्ठ मुख्य लेखनिक तर ३ वरिष्ठ श्रेणी लिपिक यांचा समावेश आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज या संदर्भात आदेश काढले आहेत.