

Chaos in Sangola? Massive Rejections in Solapur Municipal Poll Nominations Raise Questions
Sakal
सोलापूर : जिल्ह्यातील १२ नगरपालिकांमध्ये १२ नगराध्यक्षपदांसाठी १४६ तर नगरसेवक पदांसाठी २२६१ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. या उमेदवारी अर्जांची मंगळवारी छाननी प्रक्रिया झाली. यामध्ये पंढरपूर, कुर्डुवाडी व करमाळा नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाचे सर्व अर्ज मंजूर करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत प्राप्त माहितीनुसार नगराध्यक्षपदासाठीचे २५ तर नगरसेवक पदासाठीचे ४८२ उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले.