

BJP Wins Only Four Municipal Councils in Solapur District
sakal
सोलापूर: जिल्ह्यातील सर्वाधिक नगरपालिका जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपचा वारू आजच्या निकालानंतर रोखला गेला आहे. सर्वाधिक चार नगरपालिका - नगरपंचायत जिंकल्या तरी अपेक्षित यश मिळू शकले नाही. पालकमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांनी पक्ष संघटनेला विश्वासात न घेता घेतलेले निर्णय, जुन्या भाजप कार्यकर्त्यांऐवजी आयात उमेदवार अन् उमेदवार निवडीत झालेल्या चुका भाजपला नडल्या आहेत. मात्र, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मतदारसंघातील दोन नगरपालिका जिंकण्यात यश आले आहे. तसेच मोहिते - पाटील यांना वगळून स्वबळावर भाजपने चार जागा जिंकत अकलूजच्या साम्राज्यात चंचुप्रवेश केला आहे.