Solapur Ganesh Utsav 2022 : मश्रूम गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस दुसऱ्यांदा चोरीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Mushroom Ganpati temple Golden kalash stolen

Solapur Ganesh Utsav 2022 : मश्रूम गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस दुसऱ्यांदा चोरीला

सोलापूर: सोलापुरातील प्रसिद्ध मश्रूम गणपतीच्या (Mushroom Ganpati Temple) मंदिरावरील सोन्याचा कळस पुन्हा एकदा चोरली गेल्याने खळबळ माजली आहे. सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील हिप्परगा (Solapur Hipparaga) गावामध्ये हे मश्रूम गणपतीचे मंदिर असून दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येथे भाविक येत असतात. मश्रूम गणपतीच्या मंदिरावरील कळस चोरीला जाण्याची ही दुसरी घटना आहे, 2016 मध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाच आणि वीज पुरवरठा खंडित झालेला असतानाच या मंदिरावरील कळस (dome) चोरीला गेला होता. आताही मंदिरावरील सोन्याचा कळस चोरीला गेल्याने भाविकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मंदिरावरील कळस चोरीला गेल्याने संबंधितांवर कडक कारवाई करा अशी मागणी करण्यात येत आहे. मंदिराबाबत अशा वारंवार घटना घडत असल्याने भाविकांसह नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील हिप्परगा गावामध्ये हे मश्रूम गणपतीचे मंदिर आहे. या मंदिरावर सोन्याचा कळस भाविकांच्या योगदानातून गणपतीच्या मंदिरावर हा कळस बसवण्यात आला होता. गणपती मंदिरावर असलेला सोन्याचा कळस हा 25 तोळ्याचा असून सोन्याचा कळस चोरीला गेला कसा असा सवालही भक्तांतून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे याप्रकरणी कसून चौकशी करुन मश्रूम गणपतीच्या मंदिरावरील सोन्याच्या कळसाचा शोध लावून तो परत मिळवून द्यावा अशीही मागणी पुजाऱ्यांसह नागरिकांनी केली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळातच मध्यरात्री 24 तोळे सोन्याचा कळस चोरीला गेल्याने खळबळ माजली आहे.

हेही वाचा: गणेशोत्सवाने घालवली प्राजक्ताच्या मनातली ही भीती...

सिध्दरामेश्वरांनी स्थापन केलेला मश्रूम गणपती

सोलापूर जिल्ह्यातील हिप्परगा येथील मश्रूम गणपतीचे मंदिर सिद्धरामेश्वरांनी स्थापन केले आहे. नंतरच्या काळात भाविकांनी मिळून या गणेश मंदिराचा कायापालट करण्यात आला आहे. त्याचवेळी गणपती मंदिरावरही सोन्याचा कळस लावण्यात आला होता. अनेक भाविकांचे श्रद्धास्थाने असलेल्या या मश्रूम गणपतीच्या मंदिरात चोरी झाल्याने अनेक भाविकांमध्ये खळबळ माजली आहे. त्यामुळे या प्रकरणातील चोरट्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

सोन्याचा कळस दुसऱ्यांदा चोरीला

मश्रूम गणपती मंदिरावरील हा सोन्याचा कळस दुसऱ्यांदा चोरीला गेला आहे. त्यामुळे मंदिराच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. 2016 मध्येही गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस चोरट्यांनी चोरला होता. त्यामुळे गणपती मंदिरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Solapur Mushroom Ganpati Temple Golden Kalash Stolen Second Time

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..