नव्या एलएचबी कोचसह धावणार सोलापूर-म्हैसूर एक्स्प्रेस

अधिक वेगाने व नव्या लाल-पांढऱ्या रंगासह धावणार गाडी; प्रवाशांचा प्रवास होणार आरामदायी
Solapur-Mysore Express new LHB coaches solapur railway
Solapur-Mysore Express new LHB coaches solapur railwaysakal

सोलापूर : सोलापूर-म्हैसूर एक्स्प्रेसने आपले रूपडे बदलले असून, शनिवारपासून (ता. २५) नव्या लाल-पांढऱ्या रंगांसह रुळावर धावताना दिसणार आहे. त्यामुळे २१ प्रशस्त आरामदायी एलएचबी (लिंक हॉफमन बुश) कोचमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. अनेक वर्षांपासून जुनाट निळे-पांढरे डबे आता इतिहासजमा होणार आहेत. सोबतच सोलापूर-म्हैसूर एक्स्प्रेसचा वेगदेखील वाढणार आहे. सोलापूर-म्हैसूर एक्स्प्रेसला लागणारे एलएचबी कोच प्रवाशांच्या दृष्टीने सुरक्षित व प्रशस्त असे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. इतकेच नाही, तर वजनाने हलके देखील असल्यामुळे सोलापूर-म्हैसूर एक्स्प्रेसचा वेग पूर्वीपेक्षा वाढेल. पूर्वीच्या कोचमध्ये ७२ आसन क्षमता होती.

मात्र, आता एलएचबी कोचमध्ये ८० आसन क्षमता असणार आहे. २४ जूनपासून सोलापूरकडे निघणाऱ्या म्हैसूर-सोलापूर एक्स्प्रेसला नवे डबे जोडले जाणार आहेत. तर सोलापूर-म्हैसूर एक्स्प्रेसला २५ जूनपासून एलएचबी कोच जोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी या एक्स्प्रेसला आयसीएफ (इंटिग्रल कोच फॅक्टरी) निळ्या रंगाचे डबे होते. हे कोच वजनाने जड असून, प्रशस्तही नाहीत. त्यामुळे ते पूर्णपणे काढून त्याऐवजी वजनाने हलके व प्रशस्त एलएचबी कोच जोडले जाणार आहेत. यात एसी, स्लीपर, जनरल अशा तिन्ही प्रकारच्या पोस्टचा समावेश आहे. यापूर्वी अनेक प्रवासी संघटनांनी आणि प्रवाशांनी डबे बदलावेत, अशी मागणी केली होती, त्याला अनेक वर्षांनंतर यश आले आहे.

‘एलएचबी कोच’ची वैशिष्ट्ये

  • वजनाने हलके, वेग वाढणार

  • हलक्या व मजबूत धातूपासून निर्मिती

  • दुर्दैवाने अपघात झाल्यास जखमी व जीवित हानी होण्याची शक्यता कमी

  • ८० प्रवासी आसन क्षमता

अत्याधुनिक पद्धतीचा वापर

नव्या अत्याधुनिक पद्धतीने बनविण्यात आलेले एलएचबी कोच सोलापूर-म्हैसूर एक्स्प्रेसला येत्या २५ जूनपासून जोडले जाणार आहेत. प्रवाशांचा प्रवास आनंदी आणि आरामदायी होणार आहे, असे सोलापूरचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com