सोलापूर : दीड कोटीचे अंमली पदार्थ नष्ट

गांजा, अफू-बोंडे यासह विविध प्रकारचा अंमली पदार्थ जप्त केलेला होता.
Drug supply in Pune and Pimpri Chinchwad efforts are needed to curb the supply of narcotics
Drug supply in Pune and Pimpri Chinchwad efforts are needed to curb the supply of narcoticssakal

सोलापूर : अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांकडून विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या दीड कोटींच्या ७८३ किलो ९५५ ग्रॅम गांजा, अफू-बोंडेसह तब्बल दीड कोटींचे अंमली पदार्थ सोलापूर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नष्ट केले.

राज्याचे पोलिस महासंचालक यांच्या आदेशाने तसेच न्यायालयाच्या मान्यतेने सोलापूर आयुक्तालयाच्या नियुक्त पथकाच्या मदतीने सोलापूर पोलिसांनी ही कार्यवाही केली. अंमली पदार्थ विरोधी पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्तालयातील फौजदार चावडी, जेलरोड, जोडभावी पेठ, एमआयडीसी या चार पोलिस ठाण्यांच्या पथकांनी तसेच अंमली पदार्थविरोधी पथकाने अंमली पदार्थ विरोधी कारवाया करून या पदार्थाची साठवणूक, विक्री आणि ते बाळगल्याप्रकरणी विविध गुन्हे दाखल केले होते.

यात गांजा, अफू-बोंडे यासह विविध प्रकारचा अंमली पदार्थ जप्त केलेला होता. यातील चार पोलिस ठाण्यांमधील ३८ गुन्ह्यांमधील एकूण ६८०.५६ किलो गांजा व १०३.३९५ किलो अफू-बोंडे असा सुमारे १.५ कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ महापालिकेच्या भोगाव-बार्शी रोड, सोलापूर येथील बायोक्लिन सिस्टीम इंडिया प्रा. लि. या ठिकाणी नष्ट केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com