

Rajendra Raut Stresses Coordination Politics for Solapur’s Growth
sakal
सोलापूर: जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व पक्षांशी संवाद साधणारा आणि समन्वयाची भूमिका घेणारा प्रतिनिधी विधान परिषदेत जाणे गरजेचे असल्याचे मत महायुतीचे उमेदवार तथा माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केले. महायुतीने आपल्यावर मोठा विश्वास दाखविला असून सर्व घटक पक्षांतील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी पाठिशी उभे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.