Solapur : ऑक्सिजनसाठी सोलापूरला गरज वृक्षराजीची

महापालिकेने केलेल्या वृक्षगणनेतून ही माहिती समोर आली
oxygen
oxygensakal

सोलापूर : शहरातील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी, शहराची ऑक्सिजन लेव्हल वाढविण्यासाठी महापालिका क्षेत्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३३ टक्के क्षेत्र हे हरित क्षेत्र असायला हवे. ३३ टक्केच्या नियमानुसार शहरात तब्बल कमीत कमी २२ ते जास्तीत जास्त २५ लाख झाडांची आवश्यक आहे. मात्र, सध्या शहरात साधारण केवळ सात ते आठ लाख झाडे आहेत. हे क्षेत्र केवळ १० ते ११ टक्के इतकाच आहे.

महापालिकेने केलेल्या वृक्षगणनेतून ही माहिती समोर आली असून शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे काही योग्य नाही. त्यामुळे शहराला हरित करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न होण्याची आवश्‍यकता आहे. महापालिकेच्यावतीने शहर हद्दीत सुरू असलेल्या वृक्षगणनेत शहरात एकूण २७२ प्रकारची झाडे आढळून आली आहेत. त्यातील ११८ प्रकारच्या विदेशी झाडांनी शहरातील एकूण ७० टक्के हरितक्षेत्र हे व्यापल्याची धक्कादायक बाब स्पष्ट झाली असून पर्यावरण आणि आरोग्यदृष्ट्या ही झाडे घातक असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

शहरात केवळ सात ते आठ लाख वृक्ष

नियमानुसार २२ ते २५ लाख वृक्षांची आवश्‍यकता

वृक्षगणनेत धक्कादायक माहिती आली समोर

उपलब्ध वृक्षांमध्ये विदेशी झाडांचाच वेढा

अशी वाढवावी ऑक्सिजन लेव्हल

शहराचे हरितक्षेत्र वाढविण्यासाठी प्रशासनाने ॲक्शन प्लॅन तयार करावा

शहरात स्वदेशी झाडांची लागवड करावी

स्वदेशी झाडांमध्ये कडूनिंब, वड, पिंपळ, उंबर, चिंच या झाडांची प्रामुख्याने लागवड व्हावी

वृक्ष लागवड करताना कटाक्षाने विदेशी झाडे लावणे टाळावे

विदेशी झाडांचे परिणाम

शहरात मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेल्या विदेशी झाडांमुळे जैवविविधेला धोका निर्माण झाला

विदेशी झाडे जमिनीतील पाणी अधिक प्रमाणात शोधून घेतात, त्यामुळे पाणी पातळीवर परिणाम

विदेशी झाडांवर पक्षी बसत नाहीत, त्यामुळे चिवचिवाट कमी झाला व पक्षांचे प्रमाणही घटले

देशी वृक्षांविना शहर कोरडे पडल्याने धुळ वाढली

विदेशी झाडे वाढण्याचे कारण

कमी कालावधीत जास्त वाढण्याऱ्या झाडांना प्राधान्य देणे

एखाद्या परिसरात त्वरित हिरवळ निर्माण करण्यासाठी विदेशी झाडांची लागवड

एमआयडीसी परिसर व इतर प्रकल्प विकसित करताना सुशोभिकरण, आकर्षक परिसर बनविण्यासाठी विदेशी झाडांचा होत असलेला वापर

कमी कालावधीत जास्त हिरवळीसाठी विदेशी झाडांचा वापर होतो. या झाडांमुळे संबंधित शहराची जैववैविधता कमी होते. विदेशी झाडांच्या तुलनेत देशी झाडे उशिराने वाढत असली तरी पर्यावरणाचा समतोल राखण्यात आणि जैवविविधता टिकविण्यात मदत करतात. विदेशी झाडांनी परिसर कमी कालावधीत हरित होत असले तरी या झाडांवर कोणत्याही प्रकारचे पक्षी बसत नाहीत. त्यामुळे या झाडांवर पडणारी किड नष्ट होत नाहीत. तसेच जमिनीतील पाणी अधिक शोषून घेतात. त्यामुळे जमिनीतील पाण्याची प्रमाण कमी होते. पोत कमी झाल्याने धुळीचे प्रमाण वाढते. मागील दोन वर्षात शासनाने या विदेशी झाडांवर बंदी आणल्याने देशी झाडांची लागवड वाढत आहे. -

अनिल राजभर, ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ

शहरात प्रथमच वृक्षगणना होत असून तीही जिओ टॅग पध्दतीने केली जात आहे. शहराचे पर्यावरणाच्यादृष्टीने मोजमाप होण्यासाठी या गणनेचा उपयोग होणार आहे. वृक्षगणना पूर्ण झाल्यानंतर पर्यावरण ॲक्शन प्लॅन तयार करून हरितक्षेत्र वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे.

- मच्छिंद्र घोलप, उपायुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com