Solapur News : कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत 80 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे नागरिकांना आवाहन
solapur
solapursakal

मोहोळ - दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कामती पोलिसांनी गणेशोत्सव निर्भय वातावरणात पार पाडावा, यासाठी विविध कलमान्वये 80 जणावर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून,

सहा गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली आहे. दरम्यान गणेश उत्सव कालावधीत डॉल्बीचा वापर केल्यास थेट गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगत संवेदनशील गावात "रूट मार्च" केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी दिली.

कामती पोलीस ठाण्याच्या अधिपत्याखाली 28 गाव येतात. यापूर्वी या पोलिस ठाण्याच्या हद्दीत केवळ दोन गावातच एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला होता. मात्र मोहोळ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक डुणगे यांनी पदोन्नतीवर कामती पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच त्यात वाढ झाली आहे. गणेशोत्सव कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 17 गावात गणेश मंडळे, नागरिक व शांतता कमेटीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत.

solapur
Solapur News : 'ना तहसीलदार, ना मुख्याधिकारी सांगोल्याचा कारभार चालतो रामभरोसे'

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगाराकडून सर्वसामान्याला त्रास होऊ नये यासाठी भारतीय दंडविधानाच्या 107 प्रमाणे 40 जणावर प्रतिबंध कारवाई केली आहे. भारतीय दंड विधान 110 अन्वये तात्पुरत्या स्वरूपात तडीपारीची पाच जणावर, गणेशोत्सव कालावधीत दारू विक्री न करण्याबाबत मुंबई पोलीस ॲक्ट प्रमाणे दहा जणावर, भारतीय दंड विधान 144/2 ठराविक कालावधीसाठी प्रतिबंध या अन्वये 15 जणावर कारवाया करण्यात आल्या आहेत.

solapur
Solapur News : सोलापुरात फिरताहेत धोकादायक सिटी बस

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव व पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी यांच्या सहकार्याने "डॉल्बीमुक्त गणेशोत्सव" व एक गाव एक गणपती या संकल्पनेवर भर देणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डुणगे यांनी सांगितले.

solapur
Solapur News : बड्या हस्तींची मटका व्यवसायात चढाओढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com