

Swabhimani Shetkari Sanghatana Demands ₹3000 First Installment
Sakal
मंगळवेढा : जिल्ह्यात गाळपास आलेल्या ऊस दरावरून आंदोलन सुरू असताना त्याचे पडसाद आज मंगळवेढा तालुक्यात उमटले असून तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामात येणाऱ्या उसाचा पहिला हप्ता प्रति टन ३ हजार रुपये जाहीर करावा, अन्यथा सोमवारपासून तालुक्यातील सर्व कारखान्यांची ऊस गव्हाण बंद ठेवण्यात येईल, असा कडक इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला.