
Solapur : मंगळवेढ्यात कर्मचाऱ्यांच्या संपाला आमदारासह सर्व पक्षाचा पाठिंबा
मंगळवेढा : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीवरून मंगळवेढ्यात सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपाला आ.समाधान अवताडे यांनी भेट देऊन आपल्या भावना शासन दरबारी पोहचवून लवकरच सन्मानजनक तोडगा निघावा यासाठी पाठपुरावा करु अशी ग्वाही दिली. तर राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शिवला.
गेले चार दिवसापासून शासनाच्या मागण्यासाठी संपाचे हत्यार उपसले यावर अद्याप तोडगा निघाला नसल्यामुळे ते अजूनही त्यांच्या मागण्यावर ठाम आहेत. आज राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके ,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी,मा.नगरसेवक अजित जगताप यांनी पाठींबा दिला.
त्यानंतर आ.समाधान आवताडे यांनी भेट दिली. मागण्यामध्ये सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करा सर्व कंत्राटी कर्मचान्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थश्रेणी कर्मचान्यांची पदे निरसित करु नका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचान्यांना सेवांतर्गत आन्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या, व ईतर अनुषंगीक मागण्या दिर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे अखेर संपाचे हत्यार उपसले.
त्यामध्ये तालुक्यातील शासकीय रुग्णालय,माध्यमिक शाळा, महाविद्यालय,नगरपालिका, तहसील कार्यालय, बांधकाम, कृषी,जिल्हा परिषदेच्या आखत्यारीतील बांधकाम,पशुसंवर्धन,शिक्षण, आरोग्य,आरोग्य,पाणीपुरवठा, या विभागातील कर्मचारी सहभागी झाले.संपामुळे पंचायत समिती तहसील कृषी बांधकाम या शासकीय कार्यातील कामकाज पूर्णपणे थांबले आहे
त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना याचा नाहक त्रास तो असावा लागला तर दुसऱ्या बाजूला मनरेगा, घरकुल या शासकीय त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना मात्र रिकाम्या हाती परतावे लागले तर उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी प्रश्नाशी निगडित असलेल्या अनेक कामे या संपामुळे थांबली. तहसील कार्यालयात नवीन पीएम किसान नोंदणी व पुरवठा विभागात शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठी आलेल्यांना देखील रिकाम्या हाती परतावे लागले.
कोरोना सारख्या भीषण परिस्थितीत शासकीय कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय काम केले आहे त्यामुळे त्यांच्या प्रश्नासाठी आम्ही सदैव खांद्याला खांदा लावून काम करू.
सिद्धेश्वर अवताडे, अध्यक्ष खरेदी विक्री संघ
पेन्शन हा शासकीय कर्मचाऱ्यांचा हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे,त्यांच्या प्रश्नासाठी माझ्यासह कार्यकर्ते सोबत आहेत
भगीरथ भालके,राष्ट्रवादीचे नेते
कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असून त्यांच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करणार आहे .
आ.समाधान अवताडे,