Solapur : रासायनिक शेती बंद करून सेंद्रिय पिकांचे उत्पादन

संदीप यादव यांनी गोपालनातून बदलली शेती
solapur
solapur sakal

सोलापूर : वांगी क्र.१ (ता. क२रमाळा) येथील संदीप (हनुमंत) यादव यांनी गो आधारित शेती करत बन्सी गहू, काळी कुसळी गहू, विलायती, गावरान केळी यासारखी अनेक पिके सेंद्रिय पद्धतीने घेत वेगळी ओळख निर्माण केली आहे.

संदीप यादव यांचे स्वतःचे सहा एकर शेत आहे. त्यांनी घरात रासायनिक खतासाठी व्यापाऱ्याकडे सतत पैसे देऊन आणावयाची खते व त्यातून वाढलेला शेतीचा खर्च ही स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यासाठी शेतीचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सुरु केले.

सुरवातीला त्यांनी जमिनीत गायीच्या शेणखताचे प्रमाण वाढवून सेंद्रिय कर्ब वाढवण्यास सुरवात केली. त्याचा परिणाम शेतीच्या वाढत्या उत्पादनातून मिळत गेला. सुरवातीला त्यांनी एकरी ८४ टन उसाचे उत्पादन घेतले. रासायनिक खताचा संबंध हा हरित क्रांतीत उत्पादन वाढवण्यासाठी होता. पण त्यानंतर मधुमेह, कर्करोगासारख्या नव्या आजारांनी जोर वाढवला आहे तर आता सेंद्रिय पिके घेण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्याकडे १७ गायीपैकी गीर, खिलार व देवणी या तीन प्रकारच्या गाई आहेत.

त्यांनी बन्सी गहू व काळीकुसळी हे दोन गव्हाचे प्रकार उत्पादित केले. त्यांनी उत्पादित केलेल्या सेंद्रिय गव्हाला १० हजार रुपये क्विंटल भाव मिळाला. याशिवाय त्यांनी गावरान केळीचे उत्पादन प्रायोगिक रूपात घेतले. या प्रकारची पिके घेतल्यानंतर ती मुंबई व पुण्याच्या बाजारात विकली.

त्यांनी गाईच्या दुधापासून चांगले तूप, नस्य तूप, दुधाच्या विक्रीतून उत्पन्नाचा स्रोत तयार केला. तसेच विमुक्त शेतीवर ते त्यांच्या प्रयोगासह व्याख्याने देतात. त्यांनी सेंद्रिय शेती परिषदांमध्ये देखील सहभाग घेतला आहे. गोआधारित शेती करताना ती कर्जमुक्त शेती बनावी, असा त्यांनी प्रयत्न केला. कर्ज म्हटले की लाचारी येते, यामुळे त्यांनी त्यापासून स्वतःची शेती दूर ठेवली.

ठळक बाबी

एकूण ३२ गाईंचा सांभाळ शेणखत व जीवामृताच्या मदतीने शेती

बन्सी व काळीकुसळी सेंद्रिय गव्हाचे उत्पादन विषमुक्त व सेंद्रिय शेतीवर प्रबोधन विलायती, गावरान केळी व पपईचे उत्पादन

नव्या पिढीतील आजाराची वाढती संख्या पाहता विमुक्त अन्न ही काळाची गरज राहणार आहे. त्यासाठी गाईच्या शेण व गोमुत्रांचा वापर करून जमिनीची नैसर्गिक सुपिकता वाढवण्याचा प्रयत्न केला. बन्सी व काळीकुसळी गव्हाचे उत्पादन देखील चांगले मिळाले.

- संदीप यादव, वांगी क्र. १ , ता. करमाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com