Overload Transport
Overload TransportSakal

वाहनधारकांनो ओव्हरलोड वाहतूक कराल तर 40 हजारांच्या दंडास सामोरे जाल

1 डिसेंबरपासून याची मोटर वाहन सुधारणा अधिनियम 2019 ची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
Published on

सोलापूर : जुन्या मोटर वाहन कायद्याप्रमाणे दंडाची रक्कम कमी असलेली पाहून अनेक वाहनधारक सर्रासपणे नियमांना फाटा देत वाहतूक (Transport) करीत होते. मात्र शासनाने वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी सुधारित मोटर वाहन कायदा आणला आहे. ता. 1 डिसेंबरपासून याची मोटर वाहन सुधारणा अधिनियम 2019 ची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

त्यामुळे मालाची ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांनी दुसऱ्यांना गुन्हा करण्याचा विचार करू नये अशी न परवडणारी मोठ्या दंडाची शिक्षा नवीन कायद्यात आणण्यात आली आहे. सूट दिलेल्या वजनापेक्षा अधिक वाहनात वजन आढळून आल्यास थेट 40 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "सकाळी'शी बोलताना दिली.

Overload Transport
ओमिक्रॉन डेल्टालाही मागे टाकण्याची शक्यता: आरोग्य मंत्रालय

शहर जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र मालाची मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यात केली जाते. यातून अनेक वाहने ओव्हरलोड करुन वाहतूक केली जाते. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातून सोलापूर-पुणे, सोलापूर-हैदराबाद, सोलापूर-विजापूर हे राष्ट्रीय महामार्ग असून, या मार्गावर सातत्याने सर्वाधिक ओव्हरलोड वाहतूक केली जात असल्याचे दिसून येते. पूर्वी ज्यादा वजन घेऊन जाणाऱ्या वाहनांना पूर्वीच्या कायद्यात प्रत्येकी टनानुसार दंड आकारण्यात येत होता. मात्र या दंडाला वाहन मालक न जुमानता मालाची वाहतूक करीत होते.

दंड भरून देखील अनेक वाहन मालक वारंवार ओव्हरलोड वाहतुकीचा गुन्हा करीत होते. मात्र याच प्रकाराला आळा बसावा यासाठी नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. एवढ्यावरच न थांबता डिपार्टमेंट ऍक्‍शन अर्थात विभागीय कारवाईत वाहनाच्या प्रकारानुसार अतिरिक्त भाराची शिक्षा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचा आर्थिक दंड आकारण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जे वाहन मालक दंडाची रक्कम भरणार नाहीत त्यांना परवाना निलंबनाच्या कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. पहिल्यांदा गुन्हा केल्यानंतर त्याच वाहनमालकास वारंवार पकडल्यास त्यासाठी दंड आणि परवाना निलंबनाचे वेगवेगळे टप्पे करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Overload Transport
तांत्रिक अडचण आल्याने ‘सीटीईटी’ परीक्षा पुढे ढकलली

- ठरवून दिलेल्या वजनापेक्षा जेवढे टन माल असेल त्यापोटी प्रतिटन 4 हजार आकारण्यात येणार दंड

- यात चालकास 2 हजार तर मालकास 2 हजार द्यावा लागणार दंड

- मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 94 (1) प्रमाणे होईल कारवाई

- एकाच वाहनांवर एकपेक्षा अनेकदा कारवाई झाल्यास वाहन परवाना निलंबीत

नवीन मोटार वाहन कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली असून, दंडाची रक्कम थेट 40 हजार रुपये करण्यात आली आहे. यात वाहन मालकास 20 हजार तर वाहनचालकास 20 हजार रुपये अशी दंडाची आकारणी करण्यात येणार आहे.

अशी आहे जिल्हयांतील वाहनांची संख्या

आकडे बोलतात

दुचाकी

8 लाख 69 हजार 31

चारचाकी

70 हजार 674

जीप

15 हजार 861

ऍब्युलन्स

481

टक

16 हजार 347

टॅंकर्स

1 हजार 323

डिलव्हरी व्हॅन चारचाकी

20 हजार 730

डिलव्हरी व्हॅन तीनचाकी

12 हजार 114

टॅक्‍टर्स

40 हजार 250

टेलर

15 हजार 507

इतर

995

टॅक्‍सी कॅब, ऍटोरिक्षा, स्कूल बस, मिनी बस, प्रा.सर्व्हिस व्हेईकल, स्टेशन वॅगन

18 हजार 229

शासनाकडून लागू करण्यात आलेल्या नव्या नियमांची सोलापूर जिल्ह्यातही ओव्हर लोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे.

- अर्चना गायकवाड, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.