पोलिस आयुक्तपदी सोलापूरचे सुधीर हिरेमठ! स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी दोरगे यांची वर्णी

पोलिस आयुक्त हरीश बैजल हे उद्या (मंगळवारी) सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागेवर पुण्यातील सीआयडीचे उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या जूनमध्ये होतात. पण, बैजल हे मंगळवारी सेवानिवृत्त होत असल्याने हिरमेठ हे तात्पुरत्या स्वरुपात पदभार सांभाळतील.
SUDHIR HIREMATH
SUDHIR HIREMATHSAKAL

सोलापूर : पोलिस आयुक्त हरीश बैजल हे उद्या (मंगळवारी) सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागेवर पुण्यातील सीआयडीचे उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या जूनमध्ये होतात. पण, बैजल हे मंगळवारी सेवानिवृत्त होत असल्याने हिरमेठ हे तात्पुरत्या स्वरुपात पदभार सांभाळतील.

SUDHIR HIREMATH
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना जूनअखेर मिळणार १० हजार कोटींचे प्रोत्साहन अनुदान

वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या या दरवर्षी जूनमध्येच होतात. कोरोना काळात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झाल्याने त्यांच्या बदल्या जूनमध्ये झाल्यास दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत नाही. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करावा लागणार आहे. सोलापूर पोलिस आयुक्तालयातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्याही बदल्या जूनमध्ये होतील, अशी शक्यता आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त हरीश बैजल यांची बदली ऑक्टोबर २०२१ मध्ये सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदी झाली होती. शहरातील जुगार, मटका, अवैध हातभट्टी दारू विक्रीवर त्यांनी प्रामुख्याने कारवाया केल्या. त्यांनी पोलिस ठाण्यांशिवाय स्वत:चे एक विशेष पथक नियुक्त करून त्या पथकाच्या माध्यमातून अवैध व्यवसायांवर कारवाया केल्या. अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले. तृतीयपंथीयांना रोजगार, जखमी पक्ष्यांची देखभाल, पोलिस आयुक्तालयात वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लागवड, तरटी नाका येथील महिलांशी संवाद, अशा उपक्रमांचा त्यात समावेश आहे. ते उद्या (मंगळवारी) सेवानिवृत्त होत असल्याने सुधीर हिरमेठ यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला. हिरेमठ हे मूळचे सोलापूरचेच रहिवासी आहेत. मंगळवारी रात्री किंवा बुधवारी (ता. १) ते बैजल यांच्याकडून आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर नवीन पोलिस आयुक्त येईपर्यंत ते सोलापुरातच असणार आहेत.

SUDHIR HIREMATH
काँग्रेस महिला शहराध्यक्षा म्हणाल्या, महापालिकेत सत्ता आमचीच! बैठकीला ३५ महिला

गुन्हे शाखेवर दोरगे यांची नेमणूक
शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे हेदेखील उद्या (मंगळवारी) सेवानिवृत्त होत आहेत. दीड वर्षांपूर्वी त्यांच्याकडे गुन्हे शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांनी घरगुती गॅसचा इंधन म्हणून होणारा वापर, शहरातील अवैध व्यवसायांवर कारवाया केल्या. त्यांच्या जागेवर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे यांची नेमणूक करण्यात आली आहे. नवीन पोलिस आयुक्त हिरेमठ हे दोरगे यांच्याकडेच गुन्हे शाखेचा पदभार ठेवतील की नवीन पोलिस निरीक्षकास संधी देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com