Solapur : पाचशे रुपयांसाठी आंबा व्यापाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न; नऊ जणांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा

एका संशयिताला उद्यापर्यंत पोलिस कोठडी,उर्वरित संशयित आरोपींचा शोध सुरु
Murder Case
Murder Casesakal

सोलापूर - पाचशे रुपये द्यायला नकार दिल्यानंतर संशयितांनी आंब्याची पेटी मागितली, पण तेही द्यायला नकार दिल्याने नऊ जणांनी मिळून अरबाज अल्ताफ बागवान (रा. न्यू बापुजी नगर, शास्त्री नगर) या तरुण व्यापाऱ्याच्या डोक्यात हत्याराने वार केला. तसेच लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी देखील मारहाण केली. या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध सदर बझार पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

Murder Case
Mumbai News : धोकादायक इमारतीबाबत पालिका ऍक्शन मोडवर; वीज, पाणी कनेक्शन तोडण्यास केली सुरुवात

दरम्यान, बुधवारी (ता. २४) रात्री साडेदहाच्या सुमारास अरबाज बागवान हे भारत नगरातील कचरा डेपोजवळील गोडावूनमध्ये पिकअपमधील आंबा उतरवत होते. त्यावेळी रोहित परदेशी हा त्याच्या सहकाऱ्यांसोबत तेथे आला. ‘क्या अरबाज आज बहोत अच्छा आम आया है’ असे म्हणून रोहितने पाचशे रुपये मागितले. त्यावेळी सध्या आंबा छाटणीचे काम सुरु असून तू नंतर ये, असा अरबाज म्हणाला.

Murder Case
Mumbai Crime : अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी लोढा यांची पोक्सोनुसार कारवाईची मागणी

तेव्हा संशयित आरोपी रोहितने एक कॅरेट आंब्याची मागणी केली. त्यालाही नकार दिल्याने काहीवेळाने रोहित परदेशी, चेतन परदेशी, अभिषेक परदेशी, गण्या लिंबू, आरिफ शेख व त्याचे इतर चार साथीदार त्याठिकाणी आले. त्यांनी आंब्याची नासधूस केली. त्यावेळी घाबरलेला अरबाज व त्याचे वडील गोडावूनमध्ये कडी लावून लपून बसले. संशयित गोडावूनला दगड मारत असल्याने ते बाहेर आले. त्यावेळी रोहितने आरबाजच्या डोक्यात वार केला.

Murder Case
Mumbai : एमआयडीसी जलवाहिनीवर भराव टाकून अवजड वाहनांची वाहतूक

अरबाजला चक्कर आली आणि तो खाली बसला. त्यावेळी गण्या तलवार आण म्हणत अरबाज व त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. अभिषेकने दगड तर गण्याने फरशीचा तुकडा अरबाजच्या डोक्यात घातला. आरिफ शेख व इतर साथीदारांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. चेतनने अरबाजच्या वडिलांना मारहाण केली. अरबाजकडील मोबाईल संशयितांनी रोडवर आपटून फोडला. गोडावूनमधील लाईटचेही नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com