

“‘Roxy’ — Solapur Police’s new bomb detection dog; named by Police Commissioner, to join duty after training.”
Sakal
सोलापूर : शहर पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकात ‘रॉक्सी’ दाखल झाली आहे. ते बेल्जियम गेलोनाईज शेफर्ड आहे. अंदाजे ५० हजार रुपयास घेतलेली ती चार महिन्यांची मादी आहे. सहा महिन्यानंतर तिला पुण्यात बॉम्बशोधण्यासंदर्भातील सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. सोलापूर शहर पोलिसांनी शनिवारी (ता. १) ते श्वान पुण्यातून आणले आहे. पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी सोमवारी (ता. ३) श्वानाचे ‘रॉक्सी’ असे नामकरण केले.