
Big opportunity: Solapur district police announces 225 vacancies, apply by September end.
Sakal
सोलापूर : राज्याच्या रक्षणासाठी, समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या बळकटीसाठी सरकारने १५ हजार ६३१ पोलिस पदांची भरती जाहीर केली आहे. यासाठी प्रशिक्षण व खास पथकांचे अपर पोलिस महासंचालक कार्यालयाने सेवा पुरवठादार कंपनी निश्चित केली आहे. यातून सोलापूर शहर, ग्रामीण पोलिस, एसआरपीएफ क्र.१० व कारागृह विभागांतर्गत २२५ पदे भरली जाणार आहेत. २५ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील हजारो तरुण-तरुणींच्या हृदयाची धडधड आता वर्दी मिळविण्याच्या तयारीकडे वळणार आहे.