

Solapur Police Bharti 2025 — Apply before November 30; one post, one application rule in effect.
Sakal
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण पोलिस दलात ९० तर शहरात ७९ आणि कारागृह शिपायांची सुमारे १५ अशी एकूण १८४ पदांसाठी भरती होणार आहे. तर राज्यभरात पोलिस शिपाई, चालक शिपाई, बॅण्ड्समन, सशस्त्र पोलिस व कारागृह शिपाई, अशी १५ हजार ६३१ पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे. एकाच पदासाठी उमेदवाराने एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज केले तर ते बाद होणार आहेत.