सोलापूर : माहेरहून कार आण म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पती अर्जुन चेंडके, सासू नंदा चेंडके, दीर धनंजय चेंडके, जाऊ जयश्री, दीर अंकुश चेंडके (सर्व रा. वारे चाळ, मुंब्रा, जि. ठाणे) यांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. यातील फिर्यादी ज्योती अर्जुन चेंडके (वय ३२, रा. आकाश नगर, बार्शी रोड, बाळे, सोलापूर) हिचा अर्जुन चेंडके यांच्याशी विवाह झाला.