
Solapur Police seize pistols from two youths; mastermind linked to half-murder case arrested.
Sakal
सोलापूर : मूळचा कर्नाटकातील रमेश विश्वनाथ धूळ याने देशी बनावटीच्या दोन गावठी पिस्टल आणून सोलापुरातील दोन तरुणांना पोच केल्या होत्या. त्यासोबत दहा गोळ्या (जिवंत काडतुसे) देखील होत्या. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने सचिन सिद्धाराम झगळघंटे (वय ३८, रा. कर्देहळ्ळी) व फरहान अखिल शेख (वय १९, रा. अमन चौक, नवीन विडी घरकूल) या दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे.