
Summary
सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात १७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा झाली.
त्यापैकी १५ जणांवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू, बाकी १५५ जणांना प्राथमिक उपचारानंतर सोडले.
अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून अहवालानंतरच विषबाधेचे कारण स्पष्ट होणार.
सोलापूरमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याने मोठी खळबळ उडाली. यातील १५ प्रशिक्षणार्थींवर पोलिसांना सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आले आहे. पहाटेच्या वेळी १७० जणांना उलटी आणि मळमळ होऊ लागली यानंतर या सर्व प्रशिणार्थांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील १५५ प्रशिणार्थी पोलिसांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले.