esakal | "कागदपत्रे दाखवा, दंड भरा व लॉकडाउनमध्ये जप्त केलेली वाहने घेऊन जा !
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Police will release vehicles seized in lockdown

संबंधित वाहनचालकांनी कागदपत्रे दाखवून दंड भरून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन पोलिस उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर यांनी केले आहे.

कागदपत्रे दाखवा, दंड भरा व लॉकडाउनमध्ये जप्त केलेली वाहने घेऊन जा!

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेतील संसर्ग रोखण्याच्या हेतूने 23 एप्रिलपासून कडक लॉकडाउन (Lockdown) लागू करण्यात आला. या काळात शहरातील सात पोलिस (Solapur City Police) ठाण्याअंतर्गत कारवाई करताना जवळपास 327 वाहने पोलिसांनी जप्त केली. आता त्या वाहनांची सुटका करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला असून, संबंधित वाहनचालकांनी कागदपत्रे दाखवून दंड भरून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन पोलिस उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर (Deputy Commissioner of Police Dr. Vaishali Kadukar) यांनी केले आहे. (Solapur Police will release vehicles seized in lockdown)

हेही वाचा: वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्यांचा निघतोय घाम !

कडक लॉकडाउनच्या 1 ते 15 मे या काळात जप्त केलेल्या वाहनांची सुटका आता केली जात आहे. 15 मेनंतर जप्त केलेल्या वाहनांची सुटका 1 जूननंतर केली जाईल, असेही पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जप्त वाहनांची सुटका केल्यानंतर संबंधित वाहनचालकांनी वाहतूक व कोरोनासंबंधीचे नियम पाळणे बंधनकारक आहे, असेही डॉ. कडूकर यांनी स्पष्ट केले.

लॉकडाउन काळातील सवलतीचा गैरफायदा घेऊन विनाकारण अथवा किरकोळ कारणासाठी शहरात फिरणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. काहींना दंड भरून जागेवरच सोडून देण्यात आले होते. जप्त केलेल्या वाहनांचे राखण करणे जिकिरीचे काम असल्याने पोलिस प्रशासनाने आता ती वाहने सोडण्याचा निर्णय घेतला. वाहनधारकांनी संबंधित पोलिस ठाण्यात जाऊन आपापली वाहने दंड भरून घेऊन जाण्याच्या सूचनाही पोलिस उपायुक्‍त डॉ. कडूकर यांनी आज दिल्या आहेत.

हेही वाचा: मोहोळ तालुक्‍याला "डेंटल फ्लोरोसीस'चा विळखा ! का होतो हा आजार?

30 जूनपर्यंत कारवाई सुरूच

शहरातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्‍यात आल्यानंतर रस्त्यांवरील वाहनांचे प्रमाण वाढू लागले आहे. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविण्यात आल्याने नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी केले आहे. बेशिस्त वाहनचालकांवर वॉच ठेवण्यासाठी शहरातील वाहनांवरील कारवाई 30 जूनपर्यंत कायम ठेवली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.