Solapur : 'ऐलान हो चुका है, मगर..'; पंढरपुरातून मुंबईला पोहचण्यासाठी अभिजीत पाटलांना गाठावा लागणार मोठा टप्पा

शरद पवार यांनी तब्बल १७ महिने अगोदर विधानसभेचा त्यांचा नवा पैलवान कोण असेल? याचा अंदाज दिला आहे.
Solapur Political News
Solapur Political Newsesakal
Summary

पंढरपूर-मंगळवेढ्याचे राजकारण सामान्यांना समजण्याच्या पलीकडचे आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पंढरपूर या नात्यात पूर्वीपासून कै. औदुंबरअण्णा पाटील, विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि कै. भारत भालके (Bharat Bhalke) ही नावं होती.

या नात्यात आता ‘विठ्ठल’चे चेअरमन अभिजित पाटील (Abhijit Patil) यांची भर पडली आहे. पंढरपूरच्या राजकीय मैदानाची परफेक्ट नस ओळखण्यात माहीर असलेल्या शरद पवार यांनी तब्बल १७ महिने अगोदर विधानसभेचा त्यांचा नवा पैलवान कोण असेल? याचा अंदाज दिला आहे.

‘ऐलान हो चुका है... जीत अभी बाकी है...’ एका अर्थाने अभिजित पाटलांना पंढरपूरमार्गे मुंबई गाठण्यासाठी तयारीला जरा जास्तच वेळ मिळाला आहे. या वेळेचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेतच.

सोबतीला असलेल्या विठ्ठल कारखान्याला आता विठ्ठल परिवाराची जोड आणि मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीची साथ मिळविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. (Latest Marathi News)

पंढरपूर-मंगळवेढ्याचे राजकारण सामान्यांना समजण्याच्या पलीकडचे आहे. २००९ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार व तत्कालीन पॉवरफुल्ल मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव अपक्ष उमेदवार भारत भालके यांनी केला.

२०१४ ला संपूर्ण देश मोदी लाटेत धुऊन निघत असताना आमदार भालके काँग्रेसमध्ये गेले. २०१९ ला मोदींची भुरळ वाढत असताना आमदार भालके काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले आणि विजयी देखील झाले. २००९ मध्ये अपघाताने आमदार झाले म्हणून हिणवणाऱ्यांना कै. भालके यांनी २०१४ व २०१९ मध्ये चोख उत्तर दिले.

Solapur Political News
VIDEO : माजी पंतप्रधानांना अटक होताच समर्थकांनी लुटलं लष्कर अधिकाऱ्याचं घर; मोर, कोंबड्या नेल्या चोरुन

त्याच कै. भालके यांच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या वारसाला येथील मतदारांनी नाकारले. ज्या मतदारसंघात कधीच ‘कमळ’ नव्हते तिथे प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांच्या युतीतून पहिल्यांदा कमळ फुलले.

पोटनिवडणुकीतून या मातीत उगवलेले कमळ २०२४ ला खोडून काढण्याची जबाबदारी पवारांनी पाटलांवर सोपविल्याचे संकेत दिले आहेत. कमळ जोपासण्याची जबाबदारी भाजप कोणावर देणार? परिचारकांवर की आवताडेंवर? याचे संकेत भाजप कधी देणार? याकडे आता लक्ष लागले आहे.

Solapur Political News
Karnataka Election : गैरसमजुतीतून ग्रामस्थांनी केली मतदान यंत्रांची तोडफोड; अधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की

पंढरपूरच्या बाजार समितीत प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे, भगीरथ भालके यांच्यात जुळलेले सूत, मंगळवेढा बाजार समितीत आमदार समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांच्यात जुळलेले सूत राष्ट्रवादीसाठी आणि अभिजित पाटलांसाठी खरी डोकेदुखी ठरणार आहे.

त्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरणार आहे. हॅलिकॉप्टरने सोलापूरच्या दौऱ्यावर आलेल्या पवार यांनी बायरोड फिरताना सोलापूर जिल्ह्यात सध्या काय चाललंय, याचा कानोसा केव्हाच घेतला आहे.

त्यांची गाडी कधी माजी आमदार दीपक साळुंखे यांनी चालविली तर कधी विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांची चालविली. (Latest Marathi News)

गाडीत कोणाला कुठपर्यंत घ्यायचे? याचे गणित परफेक्ट ठरले होते. आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, लतीफ तांबोळी, रायप्पा हळणवर, संदीप मांडवे, जुबेर बागवान, किसन जाधव यांनी पवारांसोबत प्रवासाचा कमी-अधिक अनुभव घेतला.

माजी महापौर महेश कोठे, यू. एन. बेरिया, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, सुधीर खरटमल यांच्याशी खासगीत चर्चा करून पवारांनी या जिल्ह्यात काय आणि जिल्ह्यातील कोणाच्या मनात काय? याचा अंदाज घेतला आहे. या अंदाजावर आता पवार कधी व्यक्त होणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Solapur Political News
Karnataka Election : कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस युती होणार? युतीबाबत डीकेंचं मोठं वक्तव्य

नानांना जमले, आबांना जमेल का?

पंढरपूरमध्ये दोन मराठा नेते निवडणुकीला उभा राहिले की पराभूत होतात, हे चित्र कै. भालकेंनी २०१४ व २०१९ मध्ये बदलून टाकले. ‘भारत तू कसा निवडून येतो?’ असे कोडे पवार यांनाही पडत असावे. कै. भालकेंच्या सोबतीला कायम विठ्ठल कारखाना व शरद पवार यांची साथ होती.

तशीच साथ आता अभिजित पाटील यांना मिळाली आहे. कै. भालके यांचा आक्रमकपणा, सामान्यांमध्ये मिसळण्याचा स्वभाव, गरिबांच्या घरातील लग्नाला केली जाणारी मदत आणि दु:खाच्या प्रसंगात सांत्वनासाठी धावून जाणारे नाना ही त्यांची जमेची बाजू होती.

कै. भालके यांना ज्या गोष्टींनी लोकनायक केले, त्या गोष्टी अभिजित पाटील यांना जमतील का? हे येणारा काळच ठरविणार आहे.

Solapur Political News
Solapur : '..तर मुख्यमंत्र्यांची गाडी रस्त्यावर फिरू देणार नाही'; शिंदेंना कोणी दिला इशारा

नाव धंगेकरांचे, लक्ष्य व्होट बँकेचे

कसब्याचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचा सत्कार शरद पवार यांच्या हस्ते का झाला? याचे कोडे अनेकांना पडले आहे. सांगोल्यात मराठा आणि धनगर समाजाची ताकद जवळपास समसमान आहे.

त्यानंतर लोणारी समाज येथे निर्णायक आहे. हा समाज आपल्यासोबत ठेवण्यासाठी सांगोल्याच्या राजकारणात आमदार धंगेकर यांचे नाव सत्काराच्या निमित्ताने हाताळण्यात आले आहे.

२०२४ च्या सांगोला विधानसभा आखाड्यात आपण उतरणारच असल्याचे संकेत माजी आमदार दीपक साळुंखे यांनी या सत्कार सोहळ्यातून दिले आहेत. सांगोल्यासह पंढरपूर, मंगळवेढा, माढा व करमाळा या तालुक्यात लोणारी समाज कमी-अधिक प्रमाणात आहे. त्यांच्यावरही प्रभाव पाडण्याचा प्रयत्न या निमित्ताने झालेला दिसतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com