Solapur Politics : 10 वर्षे सत्ता असताना देखील उमेदवार ठरवताना अडचण का ? ; अ‍ॅड रमेश जोशीचा सवाल

भारतीय जनता पार्टीला सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी गेली दहा वर्षापासून सत्ता असताना देखील उमेदवार ठरवताना अडचण का ? निर्माण व्हावी किंवा कालावधीत चांगला चेहरा निर्माण का करता आला नाही पक्षाचे खासदार,आमदार, पदाधिकारी यांच्या पक्ष वाढीसाठी लक्ष देण्यामध्ये काही तोटे आहेत का ?
Solapur Politics
Solapur Politics sakal

मंगळवेढा : भारतीय जनता पार्टीला सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी गेली दहा वर्षापासून सत्ता असताना देखील उमेदवार ठरवताना अडचण का ? निर्माण व्हावी किंवा कालावधीत चांगला चेहरा निर्माण का करता आला नाही पक्षाचे खासदार,आमदार, पदाधिकारी यांच्या पक्ष वाढीसाठी लक्ष देण्यामध्ये काही तोटे आहेत का ? यासह 14 प्रश्न सोशल मीडियातून मंगळवेढ्यातील अ‍ॅड रमेश जोशी यांनी भाजप नेत्यांना उपस्थित केले.

सोलापूर लोकसभेसाठी केंद्रात व राज्यात सत्ता असताना देखील यापूर्वी लिंगराज वल्याळ प्रतापसिंह मोहिते पाटील, सुभाष देशमुख,अ‍ॅड शरद बनसोडे,जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी असे सलग भाजपाचे खासदार असताना उमेदवार ठरवताना यंदाच्या निवडणूकीत उमेदवार निश्चित करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या.यासाठी अ‍ॅड ,रमेश जोशी यांनी सोशल मीडियातून 14 प्रश्न उपस्थित करताना पक्ष नेतृत्वाने संभाव्य उमेदवार हा याच मतदारसंघातील असावा मतदारसंघ राखीव असल्यामुळे त्याची जात प्रमाणपत्र अधिकृत असावे नंतर संभाव्य गोंधळ नको याबाबत घ्यावी.त्याला मतदार संघाची पूर्ण माहिती असावी.

निदान सर्व गावांची नावे तरी सांगता यावीत.फक्त पदाधिकाऱ्यांची नावे डायरेक्ट डायरीमध्ये लिहून घेतली म्हणजे काम झाले, अशी भूमिका नको.उमेदवाराचा स्वतःचा मतदारसंघात संपर्क असावा.यासाठी स्थानिक अडचणी समजून घेणारा याच मतदारसंघातील उमेदवार असावा अशी मागणी केल्यास त्यामध्ये गैर काही नाही असे वाटत नाही का ? उमेदवारी पक्षानेच द्यायची आणि पक्षाकडे बघून मतदारांनी मतदान करायचे यामध्ये उमेदवाराचे स्वतःचे योगदान काय ? याचा देखील विचार व्हावा.

केंद्रात सत्ता येणार आहे आणि मोदी साहेब यांच्याकडे पाहून लोक मतदान करणार आहेत म्हणून इच्छुकांची गर्दी नक्कीच वाढणार आहे. उमेदवाराची स्वतःची १०/२० टक्के तरी मते नकोत का ? पक्षाबरोबर उमेदवाराची देखील स्वतःची पर्यायी यंत्रणा राबविण्याची क्षमता आहे का ? केवळ आमदार मालक यांनी सुचविले आणि आमदार बापू यांनी शिफारस केली की झाले तिकीट फायनल ! असे चित्र नको. या दोघांचीही शिफारस आवश्यकच आहे,

याची जाणीव आहे. तथापि ग्रामीण भागातील जनतेचा जुन्या पारंपारिक मतदारांचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा काय सूर आहे त्यांच्या मनात काय आहे कधी विचारणार आहात की नाही ?उमेदवार वरून लादला जात आहे असे वाटायला नको याची खबरदारी घ्यावी.पिढ्यानपिढ्याच्या भाजपाच्या जुन्या पारंपारिक मतदारांना किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खासदारांना भेटण्यासाठी जर चिठ्ठी लागत असेल किंवा पदाधिकारी बरोबर असावा अशी अपेक्षा असेल तर आपले खासदार सामान्य मतदाराला आपले आहेत असे कसे वाटणार ? उजनी धरणासाठी मंगळवेढ्यातील हजारो एकर जमिनी दिल्या आणि पाणी मात्र ज्यांची एक गुंठा देखील जमीन गेली नाही त्या मराठवाड्यातील शेतीला, जनतेला आणि अनेक शहरांना पाणीपुरवठ्यासाठी वापर केला जात आहे.

धरणातील पाण्यावर देखील जमीनी गेलेल्या शेतकऱ्यांचा अग्रक्रमाने हक्क आहे. याचा का विचार होत नाही ? त्यामुळे उजनीच्या मूळ आराखड्याप्रमाणे जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या नावाचे पाणी शिल्लक ठेवा आणि पाणी पाहून ज्या योजना राबविल्या गेल्या त्या त्वरित स्थगित कराव्यात.याचा विचार झाला असता तर आज मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील ३०/४० गावांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागला नसता.

सत्ता असो अथवा नसो येथील लोकांनी फक्त आंदोलनच करायची का ? मग आमची कामे होणार तरी कधी ? कामे होत नसतील तर मग या सत्तेचा येथील सर्वसामान्य जनतेला काय उपयोग ?ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा आमचे सरकार आहे म्हणून बढाया मारतो त्यावेळी विरोधकाकडून त्याची टिंगल केली जाते ? याला कोण जबाबदार ? केंद्र आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजना पुणे मुंबई सारख्या शहरासाठी मेट्रो रेल्वेसाठी लाखो करोडो रुपये खर्च करून राबविल्या जात असतील तर ग्रामीण भागातील जनतेने फक्त त्या बातम्या वाचून टाळ्या वाजवायच्या का ?

Solapur Politics
Solapur News : वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणची शक्कल; मोहोळमधील ५० गावात एरियल बंच कडक्टर केबल

आमच्या ग्रामीण भागातील मागण्या आम्ही कोणाला सांगायच्या ? त्यामध्ये आम्हाला ४० वर्षापासून मागणी असणारा विजयपूर पंढरपूर व्हाया मंगळवेढा हा रेल्वेमार्ग हवा आहे. 42 वर्षापासून मागणी असणारा सांगोला ते सोलापूर व्हाया मंगळवेढा असा रेल्वे मार्ग हवा आहे.

मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक होण्यासाठी अजून किती दिवस थांबायचे आम्ही ? मंगळवेढा येथे संत चोखामेळा यांचे देखील स्मारक याचे काम का मार्गी लागू शकत नाही अजून ? निदान उपरोक्त निवेदनातील आमच्या मागण्यांचा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवाराच्या जाहीरनाम्यात उल्लेख असावा आणि त्यासाठी तो उमेदवार बांधील असावा, नाहीतर बाहेरून आलेल्यांना स्टेजवर बसवा, आम्ही आहोतच खाली बसून टाळ्या वाजवण्यासाठी. अशा शब्दात आपली भूमिका मांडली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com