

Alliance Shift in Solapur: Shiv Sena Ties Up with NCP on Fifty-Fifty Basis
sakal
सोलापूर: सोलापूर शहराच्या राजकारणात नवा राजकीय ट्विस्ट आला असून, महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची युती आज जाहीर झाली आहे. दोन्ही पक्षांनी ‘फिफ्टी- फिफ्टी’चा फॉर्म्युला मान्य केला आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा आज (रविवारी) दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी केली आहे.