

Maharashtra Highway Accident Four Family Members Die After Car Hits Parked Container Near Telangwadi in Solapur District
esakal
मोहोळ: रस्त्याच्या कडेला मुरूम साईड पट्टीवर उभ्या असलेल्या कंटेनरला ईरटीका कारणे पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात आजी आजोबा सून व नातवाचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण जखमी झाला. हा अपघात सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील तेलंगवाडी ता मोहोळ शिवारातील डोंगरे वस्ती जवळ शुक्रवार ता 6 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास झाला. विलास भारंबे वय 66, शोभा विलास भारंबे वय 63, पुनम तुषार भारंबे वय 38, व पार्थ तुषार भारंबे वय 8 असे मृतांची नावे आहेत. तर तुषार विलास भारंबे वय 40 असे जखमीचे नाव असून त्यांना उपचारा साठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. मृत व जखमी कल्याण येथील रहिवाशी आहेत.