
-राजकुमार शहा
मोहोळ: मोटरसायकलला टँकरची पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात मोटार सायकल स्वाराचा मृत्यू झाला.हा अपघात शुक्रवार ता 25 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजता सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेल समोर घडला. हनुमंत महादेव मोरे वय 58 रा देवडी ता मोहोळ असे मृत झालेल्या चे नाव आहे. या अपघाताची नोंद रविवार ता 27 रोजी मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.