सोलापूर- पुणे महामार्गावर शोभेची दारू घेऊन जाणारा मालट्रक जळून खाक

मालट्रकवर वीज पडल्याचा अंदाज
 मालट्रक जळून खाक
मालट्रक जळून खाकsakal

टेंभुर्णी: सोलापूर- पुणे महामार्गावर आकुंभे गावानजिक पहाटे साडेतीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना फटाके, तोफा व इतर शोभेची दारू घेऊन जाणार्या मालट्रकने अचानक पेट घेतला. या मालट्रकवर वीज पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून मालट्रकमधील फटाके व तोफांचा आवाजाने हा परिसर अक्षरशः दणाणून गेला होता.

या घटनेमुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेतील मालट्रक चालकाने चाणाक्षपणे महामार्गाच्या बाजूला मालट्रक उभा करून पळून गेल्याने त्यांचा जीव वाचला. मालट्रक मात्र जळून खाक झाला. या मालट्रकमधील शोभेच्या दारूचा स्फोट होत असल्याने पुणे- सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार अभिमान गुटाळ यांनी सहकार्यांसह घटनास्थळी येऊन वाहतूक पर्यायी मार्गाने वळवून सुरळीत केली. पोलिसांनी विविध ठिकाणच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधला परंतु गाडी वेळेत उपलब्ध झाली नसल्याचे कळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com